Vaibhav Sooryavanshi : वयाच्या 15व्या वर्षी जागतिक सन्मान, 'TIME 100 Next' मध्ये मारली बाजी

Published : Oct 01, 2026, 10:04 PM IST

भारतीय क्रिकेटचा १५ वर्षीय युवा स्टार वैभव सूर्यवंशीने एक मोठा विक्रम रचला आहे. प्रतिष्ठित 'टाइम' मॅगझिनच्या 'TIME 100 Next 2026' यादीत स्थान मिळवणारा तो सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे.

PREV
14
वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी

भारतीय क्रिकेटचा 'वंडरकिड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने स्वतःच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. यावेळी त्याने क्रिकेटच्या मैदानाबाहेर जागतिक स्तरावर एक मोठा सन्मान मिळवला आहे.

जगभरात विविध क्षेत्रांत प्रभाव पाडणाऱ्या आणि भविष्य घडवणाऱ्या उदयोन्मुख ताऱ्यांची दखल घेणाऱ्या 'टाइम' (TIME) मॅगझिनच्या 'TIME 100 Next 2026' यादीत वैभवने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण यादीत स्थान मिळवणारा वैभव हा सर्वात तरुण व्यक्ती आहे.

24
यादीतील एकमेव भारतीय क्रिकेटपटू

या वर्षीच्या (२०२६) 'TIME 100 Next' यादीत जगभरातील क्रीडा क्षेत्रातून निवडलेल्या ७ खेळाडूंमध्ये वैभव सूर्यवंशीचा समावेश आहे. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय आणि एकमेव क्रिकेटपटू आहे!

'फेनॉम' श्रेणीत वैभवला स्थान

टाइम मॅगझिनने वैभव सूर्यवंशीचा समावेश 'फेनॉम' (Phenom) श्रेणीत केला आहे. क्रीडा विश्वातून या मानाच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या सात खेळाडूंमध्ये वैभवचा समावेश आहे. या यादीतील इतर प्रमुख खेळाडूंमध्ये आर्च मॅनिंग (अमेरिकन फुटबॉल क्वार्टरबॅक), टायरीस मॅक्सी (NBA बास्केटबॉल खेळाडू), नाओमी गिर्मा (महिला फुटबॉलपटू), फोलारिन बालोगुन (फुटबॉल स्ट्रायकर), अलेक्झांड्रा इआला (टेनिसपटू) आणि ऑलिव्हिया माइल्स (बास्केटबॉलपटू) यांचा समावेश आहे.

34
लहान वयातच गाठले यशाचे शिखर

वैभव सूर्यवंशीचा क्रिकेटचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा रंजक आहे. २०२४ च्या आयपीएल लिलावात, तो अवघ्या १३ वर्षांचा असताना राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले होते. यातून त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम रचला.

पुढच्याच वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करत, पुरुष टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. सध्या तो भारतीय संघासाठी सातत्याने दमदार कामगिरी करत आहे.

44
सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा मानही वैभव सूर्यवंशीला जातो. यातून त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला अनेक वर्षांचा विक्रम मोडला. सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातही वैभव हा सर्वात तरुण खेळाडू आहे.

Read more Photos on

Recommended Stories