Suryakumar Yadav : मुंबई रणजी संघातून सूर्यकुमार यादव आऊट, 19 वर्षांच्या खेळाडूकडे उपकर्णधारपद

Published : Oct 06, 2026, 10:28 AM IST
Suryakumar Yadav : मुंबई रणजी संघातून सूर्यकुमार यादव आऊट, 19 वर्षांच्या खेळाडूकडे उपकर्णधारपद

सार

सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघात स्थान मिळालेलं नाही. त्याने रणजी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण मुंबई संघ व्यवस्थापनाने त्याचा विचार केला नाही. ११ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे.

मुंबई : मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघातून सूर्यकुमार यादवला डच्चू मिळाला आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती, पण मुंबई संघ व्यवस्थापनाने त्याला संधी दिली नाही. चंदीगडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी नुकताच संघ जाहीर करण्यात आला आहे. ११ ऑक्टोबरपासून हा सामना सुरू होईल. विशेष म्हणजे, युवा खेळाडू आयुष म्हात्रेची संघाचा उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, दुखापतीमुळे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे.

सूर्यकुमार यादव गेल्या १८ महिन्यांपासून रेड-बॉल क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे रणजी ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेत उतरण्यापूर्वी त्याला तयारीची गरज आहे, असं मुंबईचे मुख्य निवडकर्ते राजेश पवार यांनी स्पष्ट केलं. सूर्यकुमार यादवचा क्रिकेटमधील आलेख सध्या खाली घसरत आहे. टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार असूनही त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. आता श्रेयस अय्यर टी-२० चा कर्णधार आहे.

१९ वर्षीय आयुषने भारताला अंडर-१९ विश्वचषक विजयाकडे नेलं होतं, ज्याचं खूप कौतुक झालं होतं. गेल्या दोन वर्षांत फक्त १३ प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या आयुषला भविष्यातील कर्णधार म्हणून घडवण्याची मुंबईची योजना आहे. या १६ सदस्यीय संघात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालचाही समावेश आहे. सिद्धेश लाडकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू सरफराज खानला नेतृत्वाची जबाबदारी न दिल्याने सध्या बरीच चर्चा सुरू आहे. २०२० मध्ये अंडर-१९ विश्वचषक खेळलेल्या दिव्यांश सक्सेनाला प्री-सीझनमधल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर संघात परत बोलावण्यात आलं आहे.

मुंबईचा संघ: सिद्धेश लाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे (उपकर्णधार), दिव्यांश सक्सेना, मुशीर खान, सरफराज खान, सुवेद पारकर, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसोझा, ओंकार तरमाळे.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Nic Maddinson: ३३ बॉल खेळून शून्यावर आऊट, ३ वर्षांच्या लेकाने उडवली बापाची खिल्ली!
Gautam Gambhir: 'संजू आणि वैभवचा आत्मविश्वास संपवला'; श्रीकांत यांचा गंभीरवर संताप