५ एप्रिल २०१३ रोजी बांगलादेशविरुद्ध टी-२० मॅचमधून इंटरनॅशनल डेब्यू करणाऱ्या स्मृतीने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये कमाल केली आहे.
• टेस्ट: ९ मॅचेसमध्ये ७८८ रन्स (२ सेंचुरी, ५ हाफ सेंचुरी)
• वनडे: १२० मॅचेसमध्ये ५,४११ रन्स (१४ सेंचुरी, ३५ हाफ सेंचुरी)
• टी-२०: १७९ मॅचेसमध्ये ४,७९२ रन्स (२ सेंचुरी, ३६ हाफ सेंचुरी, १०१ सिक्स)
एकूण ३०८ मॅचेसमध्ये १८ सेंचुरी आणि ७६ हाफ सेंचुरीच्या मदतीने तिने ११,००१* रन्स पूर्ण केले. टी-२० मध्ये १०० सिक्स मारणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटर असून हा रेकॉर्ड तिने सेमीफायनलमध्येच केला होता.