T20 World Cup : वेस्ट इंडिजसोबत झालेल्या सामन्यात काल कोण जिंकलं? भारत सेमिफायनलमध्ये पोहोचला का?

Published : Mar 02, 2026, 07:19 AM IST
India Into T20 World Cup Semifinals Over West Indies

सार

India Into T20 World Cup Semifinals Over West Indies : सुपर-8 च्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला हरवून सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिला. 

India Into T20 World Cup Semifinals Over West Indies : ICC पुरुष T20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. रविवारी, १ मार्च रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या विजयामुळे भारताने सेमीफायनलमधलं आपलं स्थान पक्कं केलं आहे. दुसरीकडे, या पराभवासह वेस्ट इंडिजचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता सर्वांच्या नजरा भारताच्या सेमीफायनल मॅचकडे लागल्या आहेत.

वेस्ट इंडिजने दिलं होतं १९६ धावांचं टार्गेट

टीम इंडियाने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला पहिल्यांदा बॅटिंगसाठी बोलावलं. विंडीज टीमची सुरुवात चांगली झाली. कॅप्टन होप आणि रोस्टन चेस यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची पार्टनरशिप केली. पण मधल्या ओव्हर्समध्ये टीम थोडी गडगडली. मात्र, शेवटी रोवमॅन पॉवेल आणि जेसन होल्डर यांच्यात झालेल्या चांगल्या भागीदारीमुळे टीमने १९५ धावांपर्यंत मजल मारली. होल्डरने ३७ तर पॉवेलने ३४ धावा केल्या.

संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांनी भारताला विजय मिळवून दिला

१९६ धावांच्या टार्गेटचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. फक्त ४१ धावांवर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे दोघेही १०-१० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण, संजू सॅमसनने एक बाजू लावून धरली आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्यासोबत महत्त्वाच्या पार्टनरशिप केल्या. संजूचं शतक फक्त ३ धावांनी हुकलं, पण त्याने टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवूनच मैदान सोडलं.

सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या ४ टीम्स

या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलसाठी एकूण चार टीम्स क्वालिफाय झाल्या आहेत.

  • ग्रुप-१ मधून भारत आणि दक्षिण आफ्रिका
  • ग्रुप-२ मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड

आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिल्यामुळे भारताचा सामना दुसऱ्या ग्रुपमधील टॉपर टीमशी होईल. म्हणजेच, टीम इंडियाची लढत इंग्लंडशी होणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड: कधी आणि कुठे होणार मॅच?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी सेमीफायनल मॅच ५ मार्च रोजी खेळवली जाईल. हा मोठा सामना आपल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर, पहिली सेमीफायनल ४ मार्च रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल.

कधी आणि कुठे होणार फायनल सामना?

T20 वर्ल्ड कप २०२६ चा फायनल सामना ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. दोन्ही सेमीफायनल जिंकणाऱ्या टीम्स फायनलमध्ये एकमेकांशी भिडतील.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Sanju Samson: संजू सॅमसनचा 'वन मॅन शो', वेस्ट इंडिजला हरवून भारत सेमीफायनलमध्ये!
Rinku Singh: भारतीय क्रिकेटर रिंकू सिंहवर दुःखाचा डोंगर कोसळलं, वडिलांचं कॅन्सरने निधन