मुंबई - शुभमन गिलने ठोकलेल्या द्विशतकावर सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अश्विन यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र सचिनची भावनिक पोस्ट व्हायरल झाली आहे. पहिल्यांदाच सचिनने एखाद्या खेळाडूचे एवढे कौतुक केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने द्विशतक (२६९ धावा) ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली. यासह SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.
24
शुभमन गिलचे द्विशतक
तसेच २३ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर द्विशतक झळकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या खेळाडूचा मानही त्याने मिळवला असून त्याने सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे. याशिवाय परदेशात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीचा विक्रमही शुभमन गिलने मोडला आहे.
अनेक विक्रम
याशिवाय, राहुल द्रविड (२००२ मध्ये ओव्हलवर २१७) आणि सुनील गावसकर (१९७९ मध्ये ओव्हलवर २२१) यांच्यानंतर इंग्लंडमध्ये कसोटीत भारतासाठी द्विशतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. २५ व्या वर्षी आव्हानात्मक इंग्लंडच्या भूमीवर द्विशतक झळकावणाऱ्या शुभमन गिलवर सध्याचे आणि माजी क्रिकेटपटू आणि चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
34
शुभमन गिलवर कौतुकाचा वर्षाव
भारतीय क्रिकेटचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, रविचंद्रन अश्विन आणि सुरेश रैना यांनी शुभमन गिलचे कौतुक केले आहे. याबाबत युवराज सिंगने एक्स वर पोस्ट केलेल्या एका पोस्टमध्ये, ''शुभमन गिलला सलाम. मोठ्या सामन्यात द्विशतक सहजगत्या झळकावले. छान खेळलास. पात्रतेचे द्विशतक. जेव्हा त्याचा हेतू स्पष्ट असतो तेव्हा तो अजिंक्य असतो याचे हे उदाहरण आहे'' असे म्हटले आहे.
सचिन काय म्हणाले?
शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा या दोन्ही खेळाडूंनी ज्या पद्धतीने खेळ दाखवला त्यामुळे मला खूप आनंद झाला, असे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणाले. ''शुभमन गिलच्या कर्णधारपदाची ही एक उत्तम सुरुवात आहे. हे त्याला पुढे जाण्यासाठी एक चांगले जग तयार करेल. भारताने आता दिवसभर फलंदाजी करण्याची वेळ आली आहे'' असे रविचंद्रन अश्विन म्हणाले.
त्याचप्रमाणे भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण म्हणाला, ''इंग्लंडच्या भूमीवर २०० धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार. शुभमन गिलच्या डोळ्यातला निश्चय अगदी स्पष्ट दिसत होता. आकर्षक फटकेबाजीपासून ते मजबूत बचावापर्यंत या विशेष डावात सर्वकाही होते.'' ''नेतृत्व उत्तम होते! शाब्बास, कर्णधार! शुभमन गिलचा कर्णधाराचा डाव'' असे सुरेश रैना म्हणाले.