Chinnaswamy Stadium Stampede चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू, 20 जखमींपैकी 10 गंभीर

Published : Jun 04, 2025, 05:18 PM ISTUpdated : Jun 04, 2025, 06:28 PM IST
Bengaluru

सार

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या ऐतिहासिक IPL विजयानंतर चाहत्यांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. छिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या या दुर्घटनेची प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बंगळुरु: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या ऐतिहासिक IPL विजयानंतर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सवात चाहत्यांमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हजारो चाहत्यांची एकच झुंबड

RCB चा IPL 2025 मधील पहिला विजेतेपद साजरं करण्यासाठी आज संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत स्टेडियममध्ये सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी हजारो चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. टीमचे एक झलक पाहण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत गेटवर चेंगराचेंगरी झाली.

अपघात Bowring रुग्णालयात हलवले

जखमी आणि मृतांना तत्काळ बॉवरिंग रुग्णालयात नेण्यात आलं. यामध्ये काहींना गंभीर दुखापती झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे. मृतांमध्ये एका महिलेसह दोन युवकांचा समावेश असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे.

पोलिसांनी याआधीच दिला होता इशारा

बेंगळुरु पोलिसांनी आज सकाळीच एक वाहतूक आणि गर्दी नियंत्रणावरील advisory जाहीर केली होती. त्यात त्यांनी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत विधानसौधा आणि स्टेडियम परिसर टाळण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय, पोलिसांनी स्पष्ट केलं होतं की कोणतीही विजय मिरवणूक होणार नाही आणि साजरा केवळ स्टेडियममध्येच मर्यादित राहील.

प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

या अपघातानंतर राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रसंगी पुरेशी सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाची उपाययोजना करण्यात आली होती का, याची तपासणी केली जाणार आहे.

चाहत्यांचा जल्लोष दु:खात बदलला

RCB च्या ऐतिहासिक विजयाचं उत्सवमय वातावरण एका क्षणात हळव्या आणि हृदयद्रावक वळणावर आलं. सोशल मीडियावरही चाहत्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

'ऑस्ट्रेलिया दुबळ्यांसाठी नाही...', दारुण पराभवानंतर बेन स्टोक्स संतापला, क्रिकेटमध्ये संतापाची लाट!
स्मृती मानधनाचं लग्न मोडलं, स्वतःच सोशल मीडियावरून दिली माहिती