Corona Returns नीता अंबानी यांनी सॅनिटायझर लावूनच बुमराहसोबत केला हॅन्डशेक

Published : May 22, 2025, 04:46 PM ISTUpdated : May 22, 2025, 04:47 PM IST
Corona Returns नीता अंबानी यांनी सॅनिटायझर लावूनच बुमराहसोबत केला हॅन्डशेक

सार

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी यांनी खेळाडूंना सॅनिटायझर लावून हस्तांदोलन केले. कोविड प्रकरणे वाढत असल्याने ही खबरदारी घेतल्याचे म्हटले जात आहे. 

मुंबई - दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मात्र, संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोलंदाज जसप्रीत बुमराह याला हॅंडशेक करण्यापूर्वी एमआय संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी बुमराहच्या हाताला सॅनिटायझर लावला. याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५९ धावांनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत ७३ धावांची खेळी केली, तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी ३ बळी घेत दिल्लीला आव्हान दिले.

दरम्यान, सामन्यात मुंबईचा विजय झाल्यानंतर खेळाडूंसोबत हस्तांदोलनासाठी सज्ज होत असताना, मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या हाताला सॅनिटायझर लावायला सांगितल्याचे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सामन्यानंतर खेळाडूंना हस्तांदोलन करण्यासाठी मैदानात जाण्याच्या तयारीत असलेल्या जसप्रीत बुमराह याला बोलावून त्याच्या हाताला सॅनिटायझर लावून दिल्यानंतर नीता अंबानी यांनी मुंबईचे गोलंदाज करण शर्मा याच्या हातालाही सॅनिटायझर लावून दिला. त्यानंतरच बुमराह आणि करण शर्मा दिल्लीच्या खेळाडूंना हस्तांदोलन करण्यासाठी मैदानात गेले. कोविड १९ च्या काळात खेळाडू सॅनिटायझरचा वापर जास्त करत होते.

अलिकडेच देशभरात कोविड १९ ची प्रकरणे वाढल्याने संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी काळजी घेतली. केरळ, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात जवळपास २५० कोविड १९ ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोविड १९ पुन्हा पसरत असल्याच्या बातम्यांमध्ये, मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने काल दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर खेळाडूंना हस्तांदोलन करण्याऐवजी मुठी मारण्याचा जुना पायंडा पाळला.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Sanju Samson: संजू सॅमसनची टीकाकारांना चपराक, रांचीत ठोकल्या वादळी 82 धावा
Kapil Dev: वैभव सूर्यवंशीला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, विनोद कांबळीचं दिलं उदाहरण