
LSG vs DC IPL 2026 Match Preview : आयपीएल 2026 चा पाचवा सामना आज (बुधवार, 1 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जाईल. टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल, तर मॅच 7:30 वाजता सुरू होईल. दोन्ही टीम्स या महत्त्वाच्या सामन्यासाठी लखनऊमध्ये दाखल झाल्या आहेत.
इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) गेल्या सीझनमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचू शकल्या नव्हत्या. पण यावेळेस दोन्ही टीम्सनी काही बदल केले आहेत आणि स्वतःला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
LSG ला त्यांच्या पहिल्याच मॅचपूर्वी मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार ऑलराऊंडर वानिंदु हसरंगा अजून भारतात पोहोचलेला नाही. त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून फिटनेस टेस्ट पास करायची आहे, त्यामुळे तो सुरुवातीच्या मॅचमध्ये खेळणार नाही.
दिल्ली कॅपिटल्ससाठीही परिस्थिती सोपी नाही. टीमचा फास्ट बॉलर मिशेल स्टार्क खांद्याच्या आणि कोपराच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही मॅचेस खेळू शकणार नाही.
लखनऊच्या लाल मातीच्या पिचचा विचार करता, LSG हसरंगाच्या जागी एनरिक नॉर्खियाला संधी देऊ शकते. पण टीमला फक्त परदेशी बॅट्समन मिशेल मार्श, एडेन मार्करम आणि निकोलस पूरन यांच्यावर अवलंबून राहायचं नाहीये. गेल्या सीझनमध्ये या तिघांनी 400 पेक्षा जास्त रन्स केले होते, तर भारतीय बॅट्समनचं एकूण योगदान फक्त 835 रन्स होतं.
LSG साठी सर्वात मोठा प्रश्न आहे की ऋषभ पंत कोणत्या नंबरवर बॅटिंग करेल. 2025 मध्ये त्याने नंबर 3 वर खेळताना 118 रन्सची नाबाद खेळी केली होती. तर गेल्या सीझनमध्ये पूरन 14 पैकी 12 डावांमध्ये नंबर 3 वर खेळला होता. IPL 2025 नंतर पूरनने वेगवेगळ्या लीगमध्ये नंबर 3 वर 20 डाव खेळले आहेत, तर पंतने एकही T20 मॅच खेळलेली नाही.
दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या टॉप ऑर्डरमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. केएल राहुलसोबत पथुम निसांका ओपनिंग करताना दिसू शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये चांगली कामगिरी करणारा नितीश राणा नंबर 3 वर बॅटिंग करू शकतो.
LSG विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे. DC आतापर्यंत LSG विरुद्ध 4-0 ने पुढे आहे, ज्यातले दोन सामने लखनऊमध्येच झाले होते. यावेळेस LSG आपल्या घरच्या मैदानावर हा रेकॉर्ड बदलण्याचा प्रयत्न करेल.
मिशेल मार्श
एडेन मार्कराम
निकोलस पूरन
ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर)
आयुष बडोनी
अब्दुल समद
अक्षत रघुवंशी / हिम्मत सिंह
शाहबाज अहमद
मोहम्मद शमी
मयंक यादव
दिगवेश राठी
एनरिक नॉर्खिया
केएल राहुल (विकेटकीपर)
पथुम निसांका
नितीश राणा
ट्रिस्टन स्टब्स
अक्षर पटेल (कर्णधार)
डेविड मिलर
आशुतोष शर्मा
विप्रज निगम
औकिब नबी
दुष्मंथा चमीरा
कुलदीप यादव
टी नटराजन