
IPL 2026 Super Sunday Double Heade : आज रविवार, १२ एप्रिल, क्रिकेट फॅन्ससाठी 'सुपर संडे' ठरणार आहे. आयपीएल २०२६ मध्ये आज एक नाही, तर दोन जबरदस्त मॅचेस होणार आहेत. दुपारी लखनऊमध्ये एक लढत होईल, तर रात्री मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरी मॅच रंगेल. चला, जाणून घेऊया दोन्ही मॅचेसची संपूर्ण माहिती...
दुपारची मॅच (३:३० वाजता) लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होईल. लखनऊची टीम गेल्या काही मॅचेसपासून चांगल्या लयीत दिसत आहे, विशेषतः मुकुल चौधरीच्या तुफानी बॅटिंगने सर्वांची मनं जिंकली आहेत. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला आपला हरवलेला फॉर्म परत मिळवण्याची संधी आहे.
वेळ: दुपारी ३:३० वाजता
ठिकाण: इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
पिच रिपोर्ट: इथली पिच काळ्या मातीची आहे. सुरुवातीला बॅटिंग करणं सोपं असतं, पण जसजसा खेळ पुढे जातो, तसतशी पिच स्पिनर्सना मदत करू लागते.
लखनऊ सुपर जायंट्स
एडेन मार्करम, मिशेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मुकुल चौधरी, शाहबाझ अहमद, मोहम्मद शमी, मणिमारन सिद्धार्थ, आवेश खान, प्रिन्स यादव
इम्पॅक्ट प्लेयर: दिग्वेश सिंग राठी
गुजरात टायटन्स
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, एम शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
संध्याकाळची मॅच खरी ब्लॉकबस्टर आहे. एका बाजूला रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची ताकद असलेली मुंबई आहे, तर दुसऱ्या बाजूला विराट कोहलीचा जोश असलेली बंगळूरुची टीम. वानखेडेची पिच नेहमीच बॅट्समनसाठी अनुकूल राहिली आहे, त्यामुळे इथे सिक्सर्सचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण: वानखेडे स्टेडियम, मुंबई
लाइव्ह कुठे बघाल: या मॅचेसचा आनंद तुम्ही JioHotstar ॲप आणि स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेल्सवर घेऊ शकता.
जसप्रीत बुमराह (MI): त्याचे यॉर्कर बंगळूरुच्या बॅट्समनसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
विराट कोहली (RCB): किंग कोहलीची बॅट तळपली, तर मुंबईसाठी अडचणी वाढू शकतात.
हार्दिक पांड्या (MI): कर्णधार आणि ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची असेल.
रजत पाटीदार (RCB): कर्णधार म्हणून आपल्या टीमला विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल.