
ICC CT 2025 Team India Squad: आयसीसी चैंपियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित अगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत १५ सदस्यांच्या संघाची निवड केली आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा कर्णधारपद सांभाळतील तर शुभमन गिल यांना उपकर्णधार बनवण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर मोहम्मद शमीला संघात स्थान मिळाले आहे. जसप्रीत बुमराह देखील संघाचा भाग आहेत. नीतीश कुमार रेड्डी आणि संजू सॅमसन यांच्यावर निवड समितीने विश्वास दाखवला नाही.
१९ फेब्रुवारी २०२५ पासून आयसीसी चैंपियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ज्याचे आयोजन पाकिस्तान करत आहे. भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर, ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर ठेवण्यात आली आहे. या मोठ्या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत आहेत. सर्व संघांना ४-४ च्या गटात ठेवण्यात आले आहे. गट फेरीत एकूण १२ सामने खेळले जातील. भारताला गट 'अ' मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात भारतासोबत पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचे संघ आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळेल. ज्याची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशसोबत होईल. तर भारतीय संघाचा गट फेरीतील तिसरा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडशी होईल. ४ आणि ५ मार्च रोजी सेमीफायनल, तर ९ मार्च रोजी अंतिम सामना होईल. सर्व बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.