
मुंबई : भुवनेश्वर कुमारकडे सगळं कौशल्य आहे, पण तरीही त्याच्या करिअरवर टांगती तलवार आहे. बीसीसीआय इथे संधीसाधू राजकारण करत आहे का? सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बीसीसीआयने नेमकं काय केलंय? आणि भुवीला कशाची भीती सतावतेय? याची संपूर्ण माहिती इथे वाचा.
टीम इंडियाच्या गोलंदाजीची अवस्था गेल्या ४ टी-२० सामन्यांमध्ये फारशी चांगली नव्हती. गोलंदाजांना सूर गवसत नव्हता, आणि याच कारणामुळे भुवीची संघात एन्ट्री झाली. निवड समितीसमोर जेव्हा पेचप्रसंग निर्माण झाला, तेव्हा त्यांनी भुवनेश्वर कुमारला बोलावून घेतलं. पण आता त्याच्यासमोर कोणतं नवं संकट उभं राहिलंय?
भारतीय संघाची न्यूझीलंड दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. यातून एक मोठा निर्णय समोर आलाय. अनुभवी वेगवान गोलंदाज आणि स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमारला या दौऱ्यासाठी वनडे संघातून वगळण्यात आलं आहे. बीसीसीआयने त्याला फक्त गरजेपुरतं वापरून वनडेतून बाहेरचा रस्ता दाखवलाय का, अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
भुवनेश्वर कुमारने वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात टी-२० संघात पुनरागमन केलं होतं. पण त्याला ५० षटकांच्या वनडे फॉरमॅटमधून मात्र दूर ठेवण्यात आलंय. त्यामुळे आता भुवनेश्वर कुमार वनडे वर्ल्ड कपचा भाग नसणार, हे जवळपास निश्चित झालं आहे.
निवड समितीने आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवी भुवीऐवजी युवा आणि नव्या वेगवान गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय वनडे संघाचं नेतृत्व करणार आहेत.
भुवनेश्वर कुमारने आपला शेवटचा वनडे सामना २०२२ मध्ये खेळला होता. आगामी वनडे वर्ल्ड कप ज्या देशात होणार आहे, त्या दक्षिण आफ्रिकेत त्याने आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. या सामन्यात भुवीला एकही विकेट मिळाली नव्हती. या सगळ्या घडामोडींमध्ये टीम इंडियाचं वर्ल्ड कपचं प्लॅनिंग सुरू आहे. गंभीरने गोलंदाजी विभागात योग्य गोलंदाजांची निवड केली आहे का? गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा हे तिघे टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देतील का? हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.