Anil Kumble : अनिल कुंबळेचा युवा फिरकीपटूंसाठी खास 'मास्टरक्लास'

Published : Sep 24, 2026, 03:20 PM IST
Anil Kumble : अनिल कुंबळेचा युवा फिरकीपटूंसाठी खास 'मास्टरक्लास'

सार

भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये युवा फिरकीपटूंसाठी दोन दिवसांचा खास मास्टरक्लास घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि मानसिकतेवर त्याने खेळाडूंना मार्गदर्शन केले.

मुंबई : भारताच्या काही निवडक आणि उदयोन्मुख फिरकीपटूंनी बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेसोबत दोन दिवसांचा मास्टरक्लास पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या या भारतीय गोलंदाजाकडून युवा खेळाडूंनी यशाचे धडे गिरवले. कुंबळेने या खेळाडूंच्या गोलंदाजीतील बारकाव्यांवर काम करत त्यांच्या कौशल्यात भर घातली.

बीसीसीआयने (BCCI) याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटलंय, "या महिन्याच्या सुरुवातीला, निवडक आणि युवा फिरकीपटूंनी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये भारताचा सर्वात मोठा मॅच-विनर गोलंदाज अनिल कुंबळेसोबत दोन दिवसांचा मास्टरक्लास पूर्ण केला. उच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक असते, हे या दिग्गजाकडून ऐकण्याची संधी खेळाडूंना मिळाली. तसेच कुंबळेने त्यांच्या खेळातील बारकाव्यांवर मार्गदर्शन केले. @anilkumble1074"

या महिन्याच्या सुरुवातीला, निवडक आणि युवा फिरकीपटूंनी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये भारताचा सर्वात मोठा मॅच-विनर गोलंदाज अनिल कुंबळेसोबत दोन दिवसांचा मास्टरक्लास पूर्ण केला. उच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक असते, हे या दिग्गजाकडून ऐकण्याची संधी खेळाडूंना मिळाली... pic.twitter.com/XfTbCDUHpG — BCCI (@BCCI) September 24, 2026

कुंबळेची ऐतिहासिक कारकीर्द

कुंबळेने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ६१९ कसोटी आणि ३३७ वनडे विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत ६१९ विकेट्स घेणारा तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. वनडे आणि एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ९५३ विकेट्स आहेत. आशिया इलेव्हनसाठी घेतलेल्या विकेट्स पकडून त्याच्या एकूण ९५६ विकेट्स होतात, ज्यामुळे तो जगातील चौथा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरतो.

गोलंदाजीसोबतच तो कसोटीत एक उपयुक्त फलंदाजही होता. त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये १७.७७ च्या सरासरीने २,५०६ धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

१९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एका डावात त्याने सर्व १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. जिम लेकर यांच्यानंतर कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० विकेट्स घेणारा तो इतिहासातील दुसराच गोलंदाज ठरला.

प्रशिक्षकपदाची कारकीर्द आणि सन्मान

कुंबळेने २०१६ ते २०१७ या काळात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका जिंकल्या होत्या. २०१५ मध्ये त्याला 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये (ICC Hall of Fame) सामील करून सन्मानित करण्यात आले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Virat Kohli: तिरुवनंतपुरममध्ये विराटची एन्ट्री, पहिल्या वनडेआधी चाहत्यांचा जल्लोष (WATCH)
India vs West Indies: विकास कात्याल यांची टीम इंडियाच्या मॅनेजरपदी निवड