
T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी सर्व २० संघांनी पात्रता फेरी पार केली आहे. नुकतेच यूएईने आशिया ईस्ट एशिया-पॅसिफिक क्वालिफायरमध्ये जपानला हरवून टी२० वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवली. याआधी नेपाळ आणि ओमान संघाही टी२० वर्ल्ड कपसाठी पात्र झाला होता. ही स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारत आणि श्रीलंकेत आयोजित केली जाईल. चला पाहूया या स्पर्धेत कोणते २० संघ सहभागी होत आहेत.
टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्येही २० संघांनी भाग घेतला होता आणि हे दुसरे वर्ष आहे जेव्हा २० संघ टी२० वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत. या यादीत कोणते संघ आहेत ते पाहा-
टी२० वर्ल्ड कप २०२६ फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. यात भारतातील ५ आणि श्रीलंकेतील दोन स्टेडियमचा समावेश आहे. अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळवला जाईल. जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला, तर हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल आणि जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला नाही, तर हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.
२०२६ मध्ये भारताला अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धांचे यजमानपद भूषवायचे आहे. सर्वात आधी भारताला न्यूझीलंडविरुद्ध ११ ते ३१ जानेवारी दरम्यान एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान महिला प्रीमियर लीग (WPL) चालेल. मग टी२० वर्ल्ड कप २०२६ चे आयोजन भारत आणि श्रीलंकेत होईल. तर, मार्चमध्ये आयपीएल २०२६ सुरू होईल, ज्याची संभाव्य तारीख १५ मार्च ते ३१ मे दरम्यान असेल.