Security Breach : PMO चे बनावट अधिकारी बनून मोदींच्या कार्यक्रमात घुसखोरी, बंदूकधारी अटकेत

Published : Sep 08, 2026, 07:02 PM IST
Security Breach : PMO चे बनावट अधिकारी बनून मोदींच्या कार्यक्रमात घुसखोरी, बंदूकधारी अटकेत

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. PMO चे अधिकारी असल्याचं भासवून बंदूक घेऊन कार्यक्रमात घुसलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमातील सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली असून, आता हे प्रकरण गंभीर वळण घेत आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मोदी पोहोचण्यापूर्वीच, सुरक्षा दलांनी दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एकाकडून रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे. हे दोघे पंतप्रधान कार्यालयाचं (PMO) बनावट ओळखपत्र वापरून कार्यक्रमाच्या ठिकाणी घुसले होते. संशयास्पदरीत्या फिरत असताना सुरक्षा दलांनी त्यांना पकडले आणि त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

NMACC मध्ये आयोजित होता कार्यक्रम

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील NMACC मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम शुक्रवारी, ८ सप्टेंबर रोजी होता, पण सुरक्षा दलांनी या दोघांना सोमवारी रात्रीच अटक केली. एका संशयित व्यक्तीला आणि त्याच्या बॉडीगार्डला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यापैकी एकाकडून लायसन्स असलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

अटक केलेल्या व्यक्तीकडे PMO चे बनावट ओळखपत्र

अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव रोहन पारेख (वय २४) आहे. चौकशीदरम्यान त्याच्याकडे पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र सापडले, ज्यामुळे मोठा संशय निर्माण झाला. सुरक्षा दलांनी जेव्हा हे ओळखपत्र तपासले, तेव्हा ते बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. बंदूक घेऊन आणि बनावट ओळखपत्र वापरून मोदींच्या कार्यक्रमात घुसण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे.

११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पारेख हा ड्रोनच्या व्यवसायात आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी आधी रोहनने प्रवेश केला आणि त्यानंतर त्याचा बंदूकधारी बॉडीगार्ड आला. मेटल डिटेक्टरमध्ये अलर्ट वाजताच पोलिसांनी तपासणी केली, तेव्हा बंदूक सापडली. अटक केलेल्या दोघांना कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बीकेसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Work From Home : ऑफिसमध्ये बसून जास्त काम होतं हा गैरसमज; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल
तुमची आवडती 'ओल्ड मंक' खरी रम नाहीच! मुंबई हायकोर्टात अन्न सुरक्षा प्राधिकरणाचा मोठा दावा