फक्त एका कार्डने लोकल, मेट्रो आणि बस प्रवास होणार सुलभ!
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल आणि बससाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज नाही. फक्त एकच कार्ड, ‘Mumbai 1’!
27
ट्रेन, मेट्रो, बस, सर्वांसाठी एकच कार्ड
‘Mumbai 1’ कार्ड वापरून तुम्ही लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल आणि BEST बस मध्ये सहज प्रवास करू शकता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज नाही.
37
टॅप करा आणि प्रवास सुरू!, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
हे कार्ड टॅप-टू-पे (Tap to Pay) प्रणालीवर चालते. तिकीट खिडकीवर रांगा नाहीत, फक्त एक टॅप करा आणि पुढे चला. प्रवास आणखी जलद आणि सोयीचा!