मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्यापासून 'बेस्ट'चे मार्ग बदलणार; तुमचे बस स्टॉप बदलले का? एकदा चेक कराच!

Published : Feb 28, 2026, 04:03 PM IST
BEST bus

सार

Mumbai BEST bus route changes: मुंबईतील 'बेस्ट' बस प्रशासनाने १ मार्चपासून अनेक बस मार्गांमध्ये आणि थांब्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन काही मार्ग विस्तारले आहेत. 

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट' (BEST) बस प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणजेच १ मार्च पासून मुंबईतील अनेक बस मार्गांमध्ये आणि थांब्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची मागणी आणि गर्दीचे गणित लक्षात घेऊन काही मार्ग वाढवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी वातानुकूलित (AC) बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. तुमच्या रोजच्या प्रवासावर या बदलांचा काय परिणाम होईल? जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बस मार्गांमधील फेरबदल

प्रवाशांची कमी संख्या असलेल्या थांब्यांवरील बस सेवा कमी करून, जिथे जास्त गर्दी आहे तिथे गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

बस मार्ग 'A-6': आता ही बस बॅकबे आगाराऐवजी कुलाबा आगारापर्यंत धावेल.

बस मार्ग 'A-22': विजय वल्लभ चौकऐवजी आता ही बस जिजामाता उद्यान ते मजास आगार दरम्यान धावणार आहे.

मार्ग ६९: वडाळा आगाराऐवजी आता ही बस शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे समाप्त होईल.

बस मार्ग 'A-515': ही सेवा आता सिप्झ गावाऐवजी सिप्झ बस स्थानकापर्यंत मर्यादित असेल.

'A-1' मार्गावर आता प्रवास होणार सुपरफास्ट!

CSMT ते सांताक्रुझ डेपो दरम्यान धावणाऱ्या 'A-1' बसच्या मार्गात महत्त्वाचा बदल झाला आहे. आता ही बस वांद्रे रिक्लेमेशन आणि वांद्रे पश्चिम बस स्थानकावर न जाता माहीम कोळीवाडा ते वांद्रे टॉकीज दरम्यान थेट स्वामी विवेकानंद (SV) रोडने धावेल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

दक्षिण मुंबईसाठी आनंदाची बातमी, 'A-101' चा विस्तार

CSMT ते वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान धावणारी 'A-101' बस आता थेट महात्मा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) पर्यंत धावेल. परतीच्या प्रवासात ही बस डॉ. डी. एन. रोड आणि हुतात्मा चौकमार्गे जाईल.

या मार्गांवर आता 'एसी' बसची मजा!

उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच बेस्टने खालील मार्गांवर वातानुकूलित (AC) सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बस क्रमांक,मार्ग (कुठून - कुठे)

A-203,आरसी चर्च – कमला नेहरू उद्यान

A-324,शास्त्री नगर – चांदिवली बस स्थानक (प)

A-326,अंधेरी स्थानक (प) – मिल्लतनगर

A-346,अंधेरी स्थानक (प) – रमेश नगर

A-354,अंधेरी स्थानक (प) – वीरा देसाई मार्ग

A-381,माहुल गाव – कुलाबा बस स्थानक

A-412,माजगाव आगार – मुंब्रा फाटा (ठाणे)

प्रशासनाचे स्पष्टीकरण

"आम्ही कोणताही मार्ग पूर्णपणे बंद केलेला नाही. फक्त जिथे प्रवासी कमी आहेत तिथल्या बस अधिक गर्दीच्या मार्गांवर वळवल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही."

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या लोकलने फिरताय? ही बातमी वाचल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अन्यथा होईल फजिती!
MHADA Lottery: मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडा लॉटरीसाठी 'ही' कागदपत्रे आजच तयार ठेवा