MHADA Lottery 2026: महिन्याला ३० हजार पगार असणाऱ्यांना मुंबईत घर मिळणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published : Apr 06, 2026, 05:06 PM IST

MHADA Lottery 2026: म्हाडाने मुंबईत २,६४० घरांसाठी नवीन लॉटरी जाहीर केली, ज्यामुळे विविध उत्पन्न गटांतील लोकांना घराची संधी मिळत आहे. विशेषतः ३०,००० रुपये मासिक पगार असणारे नागरिक अत्यल्प (EWS), अल्प (LIG) अशा दोन्ही उत्पन्न गटांमध्ये अर्ज करू शकतात.

PREV
16
महिन्याला ३० हजार पगार असणाऱ्यांना मुंबईत घर मिळणार का?

मुंबई: मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे! म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० घरांसाठी नवीन लॉटरी जाहीर केली असून, यामुळे सर्वसामान्यांना मुंबईच्या विविध भागांत राहण्याची मोठी संधी चालून आली आहे. पण तुमचा पगार ३० हजार असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल का? उत्पन्नाचे नियम काय आहेत? वाचा सविस्तर माहिती. 

26
उत्पन्न गट आणि वार्षिक मर्यादा

म्हाडाने अर्जदारांच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नानुसार (पती-पत्नीचे एकत्रित उत्पन्न) चार मुख्य गट केले आहेत. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

उत्पन्न गट,वार्षिक उत्पन्न मर्यादा

अत्यल्प (EWS),६ लाख रुपयांपर्यंत

अल्प (LIG),६ लाख १ ते ९ लाख रुपयांपर्यंत

मध्यम (MIG),९ लाख १ ते १२ लाख रुपयांपर्यंत

उच्च (HIG),१२ लाख रुपयांच्या पुढे (कमाल मर्यादा नाही) 

36
३०,००० पगार असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

ज्यांचा मासिक पगार ३०,००० रुपये आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न साधारण ३.६ लाख रुपये होते. असे अर्जदार 'अत्यल्प उत्पन्न गटात' (EWS) मोडतात. विशेष म्हणजे, EWS गटातील व्यक्तींना 'अल्प उत्पन्न गटातील' (LIG) घरांसाठीही अर्ज करण्याची मुभा असते. त्यामुळे ३० हजार पगार असणारे नागरिक दोन वेगवेगळ्या गटांत नशीब आजमावू शकतात. 

46
उत्पन्न गटांनुसार अर्जाची पात्रता

EWS अर्जदार: EWS आणि LIG अशा दोन्ही गटांत अर्ज करू शकतात.

LIG अर्जदार: LIG आणि MIG गटांसाठी पात्र आहेत.

MIG अर्जदार: MIG आणि HIG अशा दोन्ही गटांत अर्ज करू शकतात.

HIG अर्जदार: फक्त HIG गटासाठीच अर्ज करू शकतात. 

56
महत्त्वाची कागदपत्रे आणि नियम

अर्ज भरताना कोणतीही चूक महागात पडू शकते, त्यामुळे खालील बाबी लक्षात ठेवा.

उत्पन्नाचा पुरावा: तहसीलदार दाखला किंवा आर्थिक वर्ष २०२४-२५ (AY २०२५-२६) चे आयकर विवरणपत्र (ITR) जोडणे अनिवार्य आहे.

कौटुंबिक उत्पन्न: जर पती आणि पत्नी दोन्ही नोकरी करत असतील, तर दोघांच्याही उत्पन्नाची एकत्रित माहिती देणे बंधनकारक आहे.

सावधानता: चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊन तुमची अनामत रक्कम जप्त होऊ शकते. 

66
अर्ज कसा करावा?

म्हाडाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. इच्छुक अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. तेथे तुम्हाला घरांचे क्षेत्रफळ, किंमत आणि ठिकाणांची सविस्तर माहिती देणारी 'माहिती पुस्तिका' (Booklet) देखील उपलब्ध होईल.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories