
मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरात शुक्रवारी संध्याकाळी एका टुरिस्ट बसला आग लागल्याची घटना घडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. ही घटना गोरेगाव (पूर्व) येथील ओबेरॉय गार्डन सिटी मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या चेकनाका सिग्नलजवळ संध्याकाळी साधारण सव्वासहाच्या सुमारास घडली.
एका नागरिकाने या घटनेची माहिती दिल्यानंतर, मुंबई अग्निशमन दल (MFB), स्थानिक पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि मेट्रोचे अधिकारी अशा अनेक आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. BMC ने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कुणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.