Maharashtra Local Bodies Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हाती येण्यास सुरवात झाली आहे. भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या उमेदवारांमध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे.

03:49 PM (IST) Dec 21
03:46 PM (IST) Dec 21
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ईश्वरपूर) नगरपालिकेची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची ठरली होती. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीने एकत्र येत जयंत पाटील यांना त्यांच्याच घरात घेरण्याची रणनीती आखली होती. मात्र, जयंत पाटलांच्या व्यूहरचनेसमोर महायुतीचे सर्व प्रयत्न निष्प्रभ ठरले. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने नगराध्यक्ष पदासह एकूण २३ जागांवर दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे, महायुती आणि काँग्रेसच्या विकास आघाडीला एकत्रितपणे केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने इस्लामपुरात अद्यापही 'पाटलांचाच शब्द' चालतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
आष्टा आणि पलूसमध्येही सत्तांतर
केवळ इस्लामपूरच नव्हे, तर आष्टा नगर परिषदेतही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता खेचून आणली आहे. जयंत पाटलांच्या या दुहेरी विजयामुळे सांगलीतील महायुतीच्या नेत्यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. दुसरीकडे, पलूस नगरपरिषदेत मात्र काँग्रेसने आपला गड राखण्यात यश मिळवले असून तिथे तिरंगी लढतीत काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
03:46 PM (IST) Dec 21
राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची स्थिती आहे. या निकालांनी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना धक्का दिला असून कार्यकर्त्यांनी राज्यभरात गुलाल उधळत जल्लोष सुरू केला आहे. मात्र, या संपूर्ण निकालांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते सांगली जिल्ह्याने. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या बालेकिल्ल्यात महायुतीला जोरदार धोबीपछाड दिली आहे.
03:19 PM (IST) Dec 21
02:41 PM (IST) Dec 21
02:29 PM (IST) Dec 21
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी अनेकदा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो. पण सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीने याला छेद देत एक वेगळाच आदर्श किंवा वर्चस्वाचा नवा वस्तुपाठ समोर ठेवला आहे. अनगर नगरपंचायतीच्या सर्व १७ जागा आणि नगराध्यक्षपद असे संपूर्ण सभागृह 'बिनविरोध' निवडून आले आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने या बिनविरोध निवडीवर आता अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने अनगरच्या राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
सुनबाईंच्या विजयाचा गुलाल सासऱ्यांच्या हाती या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती नगराध्यक्ष पदाच्या प्रमाणपत्राची. नवनियुक्त नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील या सध्या वैयक्तिक कारणास्तव बंगळुरू येथे आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सासरे आणि राज्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले. "सुनबाई बंगळुरूला असल्याने मी हे प्रमाणपत्र स्वीकारले आहे," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. राजकारणात सक्रिय असलेल्या पाटील कुटुंबातील सून आता अधिकृतपणे नगराध्यक्ष झाल्या आहेत.
02:18 PM (IST) Dec 21
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. अलिबागमध्ये शेकापच्या अक्षया नाईक यांनी बाजी मारली, तर उरणमध्ये शरद पवार गटाच्या भावना घाणेकर आणि उरुण-इस्लामपूरमध्ये आनंदराव मलगुंडे यांनी विजय मिळवत पक्षाची लाज राखली. पश्चिम महाराष्ट्रात विटा नगरपरिषदेत शिंदे गटाच्या काजल म्हेत्रे तर वाईत भाजपचे अनिल सावंत विजयी झाले.
कोकण पट्ट्यात सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले आणि कणकवलीत संदेश पारकर यांच्या शहरविकास आघाडीने वर्चस्व गाजवले. मराठवाड्यात गंगाखेडमध्ये अजित पवार गटाच्या उर्मिला केंद्रे आणि औसामध्ये परवीन नवाबुद्दीन शेख यांनी विजय मिळवला.
02:18 PM (IST) Dec 21
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजप १२२ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५३ जागा जिंकून आपले अस्तित्व प्रभावीपणे सिद्ध केले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ३९ जागांवर विजयाची मोहोर उमटवली. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांनी चांगली कामगिरी केली असून, तब्बल २५ ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
दुसरीकडे, महाविकास आघाडीसाठी हे निकाल निराशाजनक ठरले आहेत. आघाडीत काँग्रेस ३४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ ७ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त ८ जागांवर समाधान मानावे लागले.
02:17 PM (IST) Dec 21
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीचा निकाल अखेर समोर आला असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. एकूण २८८ नगराध्यक्षपदांच्या जागांपैकी १२२ जागांवर कमळ फुलले असून, महायुतीने स्थानिक पातळीवरील सत्तेवर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. या निकालांनी राज्याच्या राजकारणात 'दादा-भाई' आणि भाजपची युतीच वरचढ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
भाजपची 'बिनविरोध' विजयाची हॅट्ट्रिक
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने तीन महत्त्वाच्या जागांवर मतदानापूर्वीच विजय निश्चित केला होता. जळगावमधील जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन, धुळ्यातील दोंडाईचा येथून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल आणि सोलापूरच्या अनगरमधून प्राजक्ता पाटील यांनी बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला.
02:01 PM (IST) Dec 21
पलूसमध्ये काँग्रेसने नगरपरिषदेतील सत्ता परत मिळवली आहे. येथे पलूस याठिकाणी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सत्ता राखली आहे.
01:59 PM (IST) Dec 21
सांगली जिल्ह्यामध्ये ईश्वरपूर येथे जयंत पाटील यांनी गड राखला आहे. त्यांनी येथे नगराध्यक्षपद जिंकून २३ जागा जिंकल्या आहेत.
01:46 PM (IST) Dec 21
12:30 PM (IST) Dec 21
२८८ पैकी २६७ जागांचे सुरुवातीचे निकाल हाती आले आहेत. यात भाजपने सर्वाधिक १११ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर ४८ जागांवर शिंदे गट, ४० जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट, २० जागांवर काँग्रेस, १३ जागांवर शरद पवार गट तर ९ जागांवर ठाकरे गट आघाडीवर आहे.
12:26 PM (IST) Dec 21
जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
मालवण नगरपरिषद - ममता वराडकर (शिंदे गट)
पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
12:25 PM (IST) Dec 21
आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
12:25 PM (IST) Dec 21
गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)
अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
रोहा नगरपालिका- वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
धामणगाव नगरपरिषद- डॉ. अर्चना रोठे (भाजप)
विटा नगरपरिषद- काजल संजय म्हेत्रे (शिंदे गट)
चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
11:57 AM (IST) Dec 21
हिंगोली/परळी बीड - Hingoli Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगरपालिकेत शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी यांनी 1300 मतांनी विजय मिळवला आहे. या निकालानंतर कळमनुरी नगरपालिकेत शिवसेनेचा विजय नोंदवला गेला आहे.
दुसरीकडे, Parali Beed Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 अंतर्गत बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला धक्का बसला आहे. परळीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वेंकटेश शिंदे यांनी विजय मिळवला आहे.
11:56 AM (IST) Dec 21
मुखेड/सिंधुदुर्ग - Mukhed Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 अंतर्गत मुखेड नगरपालिकेत एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर विजयी झाले आहेत. या निकालासह मुखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद शिंदे गटाकडे गेले आहे.
दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपालिकेत शिंदे सेनेला धक्का बसला आहे. एकूण आठ नगरसेवकांपैकी केवळ एक जागा शिंदे सेनेला मिळाली आहे. वेंगुर्ल्यात आघाडीवर असलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भाजपचा आहे.
वेंगुर्ले – विजयी नगरसेवक:
लीना समीर म्हापणकर (शिंदे सेना),
रवींद्र रमाकांत शिरसाट (भाजप),
गौरी माईनकर (भाजप),
प्रीतम सावंत (भाजप),
विनायक गवंडकर (भाजप),
गौरी मराठे (भाजप),
आकांक्षा परब (भाजप),
तातोबा पालयेकर (भाजप)
11:54 AM (IST) Dec 21
कोल्हापुरात भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी ठरला असून, चंदगड नगरपंचायतीमध्ये भाजपचे उमेदवार सुनील कावनेकर यांनी विजय मिळवला आहे. सुनील कावनेकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चंदगडमध्ये येऊन प्रचार केला होता.
11:53 AM (IST) Dec 21
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतमोजणीदरम्यान विविध ठिकाणी विजयी उमेदवारांची नावे समोर येत आहेत. मतमोजणीपूर्वीच भाजपला निर्विरोध यश मिळाले आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाइचा-वरवडे नगर परिषद आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगर परिषद या ठिकाणी भाजपने निर्विरोध विजय मिळवला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उणगार नगर पंचायतेतही भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
दरम्यान, बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 चा निकाल जाहीर झाला असून भाजपचे शुभम धूत आणि साखरा यांनी या प्रभागातून विजय मिळवला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेच्या संगीता मापारी आणि सुनील रासने यांनी बाजी मारली आहे.