Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जुलै हप्त्याबाबत अपडेट, रक्षाबंधन आणखीच गोड होणार

Published : Aug 25, 2026, 09:48 PM IST
Ladki Bahin Yojana

सार

Ladki Bahin Yojana July Installment : रक्षाबंधन आणखीच गोड होणार असून जुलै महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मुंबई : लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार अशी चर्चा अनेक महिलांकडून होत होती. अखेर ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा झाल्याची माहिती मिळते आहे. रक्षाबंधनाच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना १५०० रुपये जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत चर्चा होती. अखेर रक्षाबंधनाआधी १५०० रुपये जमा झाल्याने रक्षाबंधन आणखीच गोड झालं आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकाच वेळी येणार अशीही चर्चा होती. जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिने मिळून एकत्रच ३००० रुपये खात्यात जमा होतील असं बोललं जात होतं. मात्र असं न होता, जुलै महिन्याचा एक हप्ता आता ऑगस्टमध्ये महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Greenery : परदेशी नागरिकाला मुंबईची भुरळ, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचं केलं कौतुक
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर