Natasa Stankovic : नीता अंबानींच्या इव्हेंटमध्ये स्टार क्रिकेटरच्या एक्स-वाईफची एकच चर्चा

Published : Nov 02, 2026, 11:05 PM IST
Natasa Stankovic : नीता अंबानींच्या इव्हेंटमध्ये स्टार क्रिकेटरच्या एक्स-वाईफची एकच चर्चा

सार

अभिनेत्री नताशा स्टँकोविकने नीता अंबानींच्या एका खास इव्हेंटमध्ये सिल्व्हर लेहेंग्यात रॅम्प वॉक केला. तिचा हा रॉयल आणि ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यांचे स्टायलिश लूक्स चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात आणि त्याचीच चर्चा सुरू होते. आता असंच काहीसं अभिनेत्री नताशा स्टँकोविकच्या बाबतीत घडलंय. नताशाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. ती सिल्व्हर कलरच्या लेहेंग्यात एकदम रॉयल आणि ग्लॅमरस दिसत असून तिने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत.

ती भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याची एक्स-वाईफ आहे. तिने मॉडेलिंगमधून ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवलं. तिने आपल्या सौंदर्याने आणि डान्सने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ती हिंदीतील प्रसिद्ध रिॲलिटी शो 'बिग बॉस ८' मध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. त्यानंतर प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या गाण्यामुळे तिला देशभरात ओळख मिळाली. हार्दिक पांड्यासोबतचं लग्न आणि त्यानंतर झालेल्या घटस्फोटामुळे नताशा नेहमीच चर्चेत असते.

सिल्व्हर लेहेंग्यात नताशाचा रॉयल लूक!

नताशाने नुकतेच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. ती सिल्व्हर रंगाचा चमचमता लेहेंगा, आकर्षक दागिने आणि हटके पोझमध्ये खूपच स्टायलिश दिसतेय. तिने चेहऱ्याचा एक भाग लपवून दिलेली पोझ तिच्या लूकला आणखीनच खास बनवत आहे. नेटकरी हे फोटो पाहून तिच्या फॅशन सेन्सचं भरभरून कौतुक करत आहेत.

नीता अंबानींच्या भव्य इव्हेंटमध्ये लावली हजेरी!

नताशाने मुंबईत पार पडलेल्या नीता अंबानींच्या वाढदिवसाच्या खास कार्यक्रमात हजेरी लावली होती. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी या निमित्ताने 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय' या योजनेचं अधिकृत उद्घाटन केलं. ही योजना अनाथ मुलं, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडला. बॉलिवूड स्टार्स, मॉडेल्स आणि अनेक दिग्गजांनी या इव्हेंटला हजेरी लावली होती. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून फॅशन शो आणि फॅशन वीकचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अनेक सेलिब्रिटींनी आपल्या स्टायलिश लूकने लक्ष वेधून घेतलं. यात नताशाचा रॅम्प वॉक एक खास आकर्षण ठरला.

समाजसेवेच्या संकल्पाने नीता अंबानींनी वेधलं लक्ष!

नीता अंबानी या खास सोहळ्यात आपली मुलगी ईशा अंबानीसोबत पारंपारिक वेशभूषेत दिसल्या. हा कार्यक्रम एका बाजूला फॅशन इव्हेंटचा ग्लॅमर आणि दुसऱ्या बाजूला समाजातील उपेक्षित घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली नवी योजना, अशा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला.

या योजनेचं मुख्य उद्दिष्ट अनाथ मुलं, वृद्ध आणि दिव्यांगांना सन्मानाचं जीवन जगता यावं हे आहे. नीता अंबानींनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं जीवन जगण्याची संधी मिळावी या विचाराने सुरू केलेल्या या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे, नताशाने याच कार्यक्रमात रॅम्प वॉक करत आपल्या आकर्षक लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Tukaram Mundhe : 'लोकांचा नायक' म्हणणाऱ्या हर्ष गोयंकांना तुकाराम मुंढेंनी दिलेलं उत्तर जिंकतंय मन
Mumbai Weather Today: मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा, हवेची गुणवत्ता मात्र खराब