Akasa Air Viral Video : मुंबई एअरपोर्टवर प्रवाशाची बॅग फुटली, अकासा एअरच्या कर्मचाऱ्यांच्या उत्तराने संताप

Published : Oct 16, 2026, 03:57 PM IST
Akasa Air Viral Video : मुंबई एअरपोर्टवर प्रवाशाची बॅग फुटली, अकासा एअरच्या कर्मचाऱ्यांच्या उत्तराने संताप

सार

मुंबई एअरपोर्टवर एका प्रवाशाची बॅग पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत मिळाली. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून अकासा एअरच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर संताप व्यक्त होत आहे.

मुंबई : मुंबई एअरपोर्टवर एका प्रवाशासोबत खूपच संतापजनक प्रकार घडला आहे. विमानतळावर पोहोचल्यावर या प्रवाशाला त्याची बॅग पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत मिळाली. बॅगेचं चाक तुटलं होतं आणि कव्हरही फाटलं होतं. पण यापेक्षा जास्त राग प्रवाशाला तेव्हा आला, जेव्हा त्याने मदतीसाठी ग्राऊंड स्टाफकडे धाव घेतली आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

विशाल एम. यादव नावाच्या एका एक्स (X) युजरने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा प्रवासी अकासा एअरच्या (Akasa Air) फ्लाईटने आला होता. व्हिडिओमध्ये तो आपल्या तुटलेल्या बॅगेची अवस्था दाखवत आहे. तसंच, तक्रार करूनही ग्राऊंड स्टाफने कशी दखल घेतली नाही, यावर तो त्यांच्याशी हुज्जत घालताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये प्रवाशाने आपला कॅमेरा बॅगेकडे वळवला आणि डाव्या बाजूच्या तुटलेल्या चाकावर झूम केलं. तिथे बॅग पूर्णपणे फाटलेली दिसत होती. त्यानंतर त्याने कॅमेरा कर्मचाऱ्यांकडे फिरवला आणि आपला संताप व्यक्त केला. तो म्हणाला, "हे बघा, ही बॅग इथून फाटली आहे. मी स्टाफला याबद्दल विचारलं, तर ते म्हणतात की बॅग तुटलेली दिसत नाहीये. आता मी थेट ऑनलाइन तक्रारच करणार आहे."

प्रवासादरम्यानच ही बॅग तुटल्याचा दावा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे. तसंच, मदतीसाठी गेल्यावर ग्राऊंड स्टाफने दिलेल्या उत्तरावरही कडक टीका करण्यात आली आहे.

अकासा एअरने दिलं स्पष्टीकरण

या वादानंतर अकासा एअरच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “आम्हाला ग्राहकाच्या समस्येची जाणीव आहे आणि त्यांना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो जुना असून तो पुन्हा एकदा शेअर केला जात आहे. आम्ही या ग्राहकाशी संपर्क साधून त्यांची समस्या सोडवली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी अकासा एअर नेहमीच कटिबद्ध आहे.” हा व्हिडिओ जुना असल्याचं एअरलाईन्सने स्पष्ट केलं असून, प्रवाशाशी संपर्क साधून हा वाद मिटवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bombay High Court: नातेवाईकांच्या घरी धुणी-भांडी करायला सांगणे हा छळ नाही, हायकोर्टाचा निकाल
Viral Video : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा, व्हिडिओ तुफान व्हायरल