79 दिवसांनंतर चरणस्पर्श दर्शन सुरू, विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमली भाविकांची मांदियाळी

Published : Jun 02, 2024, 01:38 PM ISTUpdated : Jun 02, 2024, 01:43 PM IST
vitthal darshan

सार

आज सकाळी साधारण 6 वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. बऱ्याच दिवसांनंतर विठ्ठलाचे दर्शन झाल्याने भाविकांच्याही चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव होता. 

आज तब्बल 79 दिवसानंतर विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनास सुरुवात झाल्याने आषाढी एकादशीप्रमाणेच पंढरपुरात गर्दी दिसून आली. देवाचं देखणं रूप पाहण्यासाठी काल रात्री 8 वाजल्यापासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तासन् तास या ठिकाणी उभे राहून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. आज सकाळी साधारण 6 वाजल्या पासून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. या दरम्यान भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. तसेच, लहान मुलांसग अबाल वृद्ध देखील या रांगेत उभे होते. या ठिकाणी जमलेली गर्दी पाहून तर जणू या भाविकांना देवाकडे भरपूर काहीतरी मागायचं आहे, साकडं घालायचं आहे हेच जाणवत होतं.

या ठिकाणी जमलेल्या भाविकांना पावसाचे साकडे घालायचे होते, भीषण पाणीटंचाई दूर व्हावी तसेच महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हाला असं साकडं घालायचं होतं. शेतकऱ्यांवरील सुकाळ येऊ दे आणि राजकारण्यांवर दुष्काळ येऊ दे अशीही मागणी देवाकडे मागणार असल्याचे एका भाविकाने सांगितले. बऱ्याच दिवसांनंतर विठ्ठलाचे दर्शन झाल्याने भाविकांच्याही चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव होता.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

मुंबई-गोवा रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! भर उन्हाळ्यात 'या' ८ एक्स्प्रेस गाड्या रद्द; पर्यटनाचा प्लॅन करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा
सावधान! तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूचे 'हे' रस्ते ३ दिवस बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा पर्यायी मार्ग आणि पार्किंगची सोय