आमदारांच्या शपथविधीचे व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या नेमकं कोण काय काय म्हणाले?

Published : Jul 28, 2024, 02:49 PM IST
 Milind Narvekar Bhavna Gawli

सार

MLC Oath Ceremony : विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला असून यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली. 

MLC Oath Ceremony : महाराष्ट्र विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा रविवारी पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांनी रविवारी 28 जुलै रोजी शपथ घेतली. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.

विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबचा उल्लेख केला. त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करुन मी शपथ घेतो की मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार, जय हिंद जय महाराष्ट्र”, असे मिलिंद नार्वेकर शपथ घेताना म्हणाले.

 

 

तर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना ‘जय लहूजी, जय भीम, जय संविधान’ असे म्हटले. तसेच अमित गोरखे यांनी गळ्यात जय लहूजी असं लिहिलेला एक पट्टा घातला होता. तो व्हिडिओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

 

तर भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘शेवटी जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ असे म्हटले आहे. सध्या या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘या’ आमदारांनी घेतली शपथ

पंकजा मुंडे – भाजप

योगेश टिळेकर – भाजप

अमित गोरखे – भाजप

परिणय फुके – भाजप

सदाभाऊ खोत – भाजप

भावना गवळी – शिंदे शिवसेना

कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना

शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रज्ञा सातव – काँग्रेस

मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष

आणखी वाचा : 

वरळी विधानसभेच्या जागेवर राज ठाकरे उभा करणार उमेदवार, खास रणनीती बनवणार

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Pune Viral Video : पुण्यात आयटी इंजिनिअर महिलेला बाईक टॅक्सी चालकाने अर्ध्या रस्त्यात उतरवले
Pune Cab Dispute : पुण्यात आयटी तरुणीचा ३०० रुपये कॅब भाडं देण्यास नकार, ड्रायव्हरला दिली पोलिसांची धमकी