Shaktipeeth Mahamarg Village List: कोल्हापूरचा कायापालट! 'शक्तिपीठ' महामार्गाचा नवा आराखडा मंजूर; ७३ गावांतून धावणार हायवे, पाहा संपूर्ण यादी

Published : Apr 07, 2026, 09:28 PM IST
Shaktipeeth Expressway

सार

Shaktipeeth Mahamarg Village List: राज्य सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील 'शक्तिपीठ महामार्गा'ला मंजुरी दिली आहे. हा ८५६.७६ किमीचा महामार्ग वर्धा ते सिंधुदुर्गला जोडणार असून, यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ७३ गावांचा विकास होणार आहे. शेतकरी आंदोलनानंतर सुधारित आराखड्यानुसार, हा महामार्ग पर्यटन आणि उद्योगांना चालना देईल.

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या 'शक्तिपीठ महामार्गा'ला (Shaktipeeth Mahamarg) राज्य सरकारने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. वर्धा ते सिंधुदुर्ग (बांदा) अशा ८५६.७६ किलोमीटरच्या या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, जिल्ह्यातील तब्बल ७३ गावांची नशीब उघडणार आहे.

शेतकरी आंदोलनानंतर 'नवा' प्लॅन तयार!

सांगली आणि कोल्हापुरातील बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या जनभावनांची दखल घेत सरकारने मूळ आराखड्यात मोठे बदल केले आहेत. आता या सुधारित मार्गामुळे सातारा जिल्ह्यालाही नवा कनेक्ट मिळाला असून, दुर्गम गावे मुख्य प्रवाहात येणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील ७३ गावांची तालुकानिहाय यादी

तुमच्या गावाचा या महामार्गात समावेश आहे का? पाहा सविस्तर तपशील.

हातकणंगले तालुका: जुने पारगाव, नवे पारगाव.

पन्हाळा तालुका: वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे.

करवीर तालुका: केर्ली केलें, पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपिरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला.

राधानगरी तालुका: राशिवडे बु., चंदे, येळवडे, कोलवडे, वाघावडे, मोहाडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे.

कागल तालुका: बोरवडे, उंदरवाडी.

भुदरगड तालुका: नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली.

आजरा तालुका: हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, मसोली, देऊळवाडी.

चंदगड तालुका: बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बु., कानूर खु., पिळणी, झांबरे धरण, इसापूर.

कसा असेल हा 'गेमचेंजर' महामार्ग?

१३ जिल्हे आणि ४० तालुक्यांना जोडणारा हा महामार्ग केवळ रस्ता नसून विकासाची नवी वाहिनी ठरेल.

सांगली: २५ गावे,  सातारा: १६ गावे, सोलापूर: ३५ गावे या महामार्गाला थेट जोडली जातील.

डोंगराळ भागात अत्याधुनिक घाटमार्ग आणि नद्यांवर भव्य पुलांचे जाळे विणले जाणार आहे.

विकासाच्या नव्या संधी

या महामार्गामुळे कोल्हापुरातील पर्यटन, गूळ उद्योग आणि शेती उत्पादनांच्या वाहतुकीला मोठी गती मिळेल. प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होणार असल्याने रोजगाराच्या लाखो संधी स्थानिक पातळीवर निर्माण होतील.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'