Amit Shah on Uddhav Thackeray : पुण्यात महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
Amit Shah on Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. औरंगजेब फॅन क्लब राज्याला सुरक्षित ठेवू शकतात का?" असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुण्यात महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ विकासाचा राहिला
अमित शाह म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ हा विकासाचा राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मोदी आले आणि त्यांनी ३० हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. देशाच्या जनतेने राहुल गांधी यांच्या खटाखटवर विश्वास ठेवला नाही. हिमाचल, कर्नाटक आणि तेलगणा मध्ये तुमचे सरकार आहे, मग तेथील लोकांना पैसे द्या, असं आव्हानही अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर ठेवले.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले 10 लाख कोटी
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, शरद पवारांना आज विचारतो की दहा वर्ष तुमचे सरकार होत तेव्हा काय केले तुम्ही? काहीच केले नाही. दहा लाख कोटी आपल्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. यांच्या काळात यांनी काय दिल? त्यांनी सांगावं. भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात.
सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले?
आम्ही 2014 ला आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर गायब होईल. काँग्रेस वाले अपप्रचार करत आहेत. इतकी वर्ष तुमचे देशात सरकार होते मग गरीबांचे कल्याण का नाही केले? राम जन्मभूमिसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केलाय. आम्ही मंदिर बनवून दाखवले. उत्तराखंडमध्ये आम्ही समान नागरी कायदा आणला. आता संपूर्ण देश वाट बघतोय. आम्ही आतकवाद संपवून टाकला, असंही अमित शाह म्हणाले.
आणखी वाचा :
पवार-ठाकरे-पटोलेंनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी : उपमुख्यमंत्री फडणवीस