
Independence Day 2025 : भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या विशेष दिनानिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सामान्य प्रशासन विभागाने (राजशिष्टाचार शाखा) एका परिपत्रकाद्वारे जाहीर केल्यानुसार, राज्याच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण कोणत्या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, याची यादी निश्चित करण्यात आली आहे.
या वर्षीचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुंबईतील मंत्रालयात पार पडणार असून, सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल. तर, पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
१. ठाणे - एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
२. बीड - अजित आशाताई अनंतराव पवार
३. नागपूर - चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
४. अहिल्यानगर - राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील
५. गोंदिया - छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ
६. सांगली - चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
७. नाशिक - गिरीश गीता दत्तात्रय महाजन
८. पालघर - गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
९. जळगाव - गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
१०. अमरावती - दादाजी रेश्माबाई दगडू भुसे
११. यवतमाळ - संजय प्रमिला दुलिचंद राठोड
१२. रत्नागिरी - उदय स्वरुपा रवींद्र सामंत
१३. धुळे - जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
१४. जालना - श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
१५. नांदेड - अतुल लिलावती मोरेश्वर सावे
१६. चंद्रपूर - डॉ. अशोक जनाबाई रामाजी वुईके
१७. सातारा - शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई
१८. मुंबई उपनगर - ॲड. आशिष मिनल बाबाजी शेलार
१९. वाशिम - दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
२०. रायगड - कु. आदिती वरदा सुनिल तटकरे
२१. लातूर - शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
२२. नंदुरबार - ॲड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
२३. सोलापूर - जयकुमार कमल भगवानराव गोरे
२४. हिंगोली - नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
२५. भंडारा - संजय सुशिला वामन सावकारे
२६. छत्रपती संभाजीनगर - संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
२७. धाराशिव - प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
२८. बुलढाणा - मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
२९. सिंधुदुर्ग - नितेश निलम नारायण राणे
३०. अकोला - आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
३१. कोल्हापूर - प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर
३२. गडचिरोली - ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
३३. वर्धा - डॉ. पंकज कांचन राजेश भोयर
३४. परभणी - श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर
वरील यादीमध्ये काही कारणास्तव बदल झाल्यास किंवा निश्चित केलेले मंत्री उपस्थित राहू शकले नाहीत, तर विभागीय मुख्यालयात विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तसेच, कोकण भवन येथील ध्वजारोहण कोकण विभागाच्या आयुक्तांच्या हस्ते होणार आहे.