आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होणार असून सरकार कोणाचे येणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी की महायुती कोण सरकार स्थापन करणार याकडे लक्ष लागलय.
07:27 PM (IST) Nov 23
काँग्रेसची पत्रकार परिषद सुरु असून पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचं यामध्ये रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे.
07:22 PM (IST) Nov 23
कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार विजयी झाले आहेत.
07:09 PM (IST) Nov 23
शरद सोनवणे हे हेलिकॅप्टरने मुंबईला रवाना झाले आहेत. ते जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
06:36 PM (IST) Nov 23
राम सातपुतेंना पराभवाचा झटका बसला असून येथून उत्तमराव मानकर निवडून आले.
06:10 PM (IST) Nov 23
सांगोला मतदारसंघातून बाबासाहेब देशमुख विजयी झाले आहेत. येथून त्यांनी शिवसेनेच्या शहाजीबाप्पू पाटील यांचा पराभव केला आहे.
05:30 PM (IST) Nov 23
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले असून त्यांचा कामठी हा मतदारसंघ होता.
03:57 PM (IST) Nov 23
लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
03:56 PM (IST) Nov 23
बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार विजयी झाले आहेत.
03:55 PM (IST) Nov 23
फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण विजयी झाल्या आहेत.
03:04 PM (IST) Nov 23
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून काशिनाथ दाते सर आघाडीवर आहेत. येथे त्यांच्या विरोधात राणी लंके या लढत देत आहेत.
03:03 PM (IST) Nov 23
महायुती २२४ जागा घेऊन सत्ता स्थापन करणार असून मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागले आहे.
02:12 PM (IST) Nov 23
पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ७ वाजता भाजपच्या कार्यलयात जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील विजयाच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
01:40 PM (IST) Nov 23
मागाठाणे मतदारसंघात शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे विजयी झाले आहेत.
01:08 PM (IST) Nov 23
बारामतीमधून अजित पवार ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत.
12:09 PM (IST) Nov 23
भाजपाचा विजयाचा स्ट्राईक रेट ८४% असून त्यांनी यावेळी मोठा विजय मिळवला आहे.
11:33 AM (IST) Nov 23
श्रीवर्धनमधून अदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत. त्या खासदार तटकरे यांच्या कन्या आहेत.
11:27 AM (IST) Nov 23
पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर असून अतुल भोसले हे आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.
11:21 AM (IST) Nov 23
भाजपा १२१, शिवसेना ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३७ जागा घेऊन आघाडीवर असून महायुती २१४ जागा घेऊन आघाडीवर आहेत.
11:18 AM (IST) Nov 23
आदित्य ठाकरे हे दुसऱ्या फेरीअखेर पुढे जाऊन पोहचले असून ते वरळी विधानसभा मतदारसंघातून उभे होते.
10:42 AM (IST) Nov 23
वांद्रा पूर्वमधून वरून सरदेसाई हे दुसऱ्या फेरीअखेर मागे पडले असून येथे त्यांच्या विरोधात झिशान सिद्दीकी हे लढत आहेत.
10:33 AM (IST) Nov 23
अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी जाऊन पोहचले आहेत.
10:31 AM (IST) Nov 23
बाळासाहेब थोरात हे संगमनेरमधून ४००० मतांनी पिछाडीवर गेले आहेत.
10:27 AM (IST) Nov 23
तिसऱ्या फेरीअखेर धनंजय मुंडे ९१४६ मतांनी आघाडीवर पोहचले आहेत. त्यांच्या विरोधात राजे देशमुख हे तुतारी चिन्हावर उभे होते.
10:20 AM (IST) Nov 23
सांगोला विधानसभा मतदारसंघातून शाहजी बापू पाटील पिछाडीवर गेले असून येथून शेतकरी कामगार पक्षाचे देशमुख पुढे गेले आहेत.
10:18 AM (IST) Nov 23
महायुती १४१ आणि महाविकास आघाडी १३३ जागांवर आघाडीवर आहे.
09:26 AM (IST) Nov 23
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर असून येथे महायुतीचे अमोल खताळ पिछाडीवर पोहचले आहेत.
09:11 AM (IST) Nov 23
येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ हे १३०० मतांनी पिछाडीवर असून येथे माणिकराव शिंदे आघाडीवर आहेत.
09:04 AM (IST) Nov 23
महायुती १३७ आणि महाविकास आघाडी १३४ जागी आघाडीवर आहेत.
08:58 AM (IST) Nov 23
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात काशिनाथ दाते आघाडीवर असून ते १५०० मतांनी पुढे आहेत.
08:54 AM (IST) Nov 23
मावळ येथून सुनील शेळके हे आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बापू भेगडे हे अपक्ष उमेदवार उभे होते.
08:46 AM (IST) Nov 23
बारामती येथून अजित पवार आघाडीवर पोहचले आहेत. पोस्टल मतदानात सुरुवातीला युगेंद्र पवार आघाडीवर होते.
08:43 AM (IST) Nov 23
आंबेगाव येथे देवदत्त निकम हे आघाडीवर असून दिलीप वळसे पाटील यांना येथे मोठा धक्का बसत असल्याचं दिसून येत आहे.
08:40 AM (IST) Nov 23
भाजपा हा पक्ष ६६ जागांवर आघाडीवर असल्याचं सुरुवातीच्या निवडणूक निकालातून दिसून येत आहे.
08:31 AM (IST) Nov 23
भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे हे आघाडीवर असून त्यांची लढत अजित गव्हाणे यांच्याशी होत आहे.
08:29 AM (IST) Nov 23
भाजपा सध्या सर्वात मोठा पक्ष ठरत असून ४१ जागांवर आघाडी होताना दिसत आहे.
08:27 AM (IST) Nov 23
वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. येथे त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा हे निवडणूक लढवत होते.
08:24 AM (IST) Nov 23
माहीम मतदारसंघात अमित ठाकरे हे आघाडीवर आहेत.
08:03 AM (IST) Nov 23
कामठी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे हे आघाडीवर पोहचले आहेत.
08:01 AM (IST) Nov 23
नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर पोहचले आहेत. येथे पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
08:00 AM (IST) Nov 23
पहिला निवडणुकीचा कल भाजपच्या बाजूने असून शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातून आघाडीवर पोहचले आहेत.