Maharashtra Assembly Election 2024 Voting: संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान

सार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ एका टप्यात होणार आहे. २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच टप्यात आज मतदार मतदान करणार आहेत. 

06:13 PM (IST) Nov 20

भाजप उमेदवार नितेश राणे यांनी केले मतदान

भाजप आमदार नितेश राणे यांनी मतदान केले आहे. त्यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून मतदान केले आहे. 

06:11 PM (IST) Nov 20

अभिनेता शक्ती कपूरने केले मतदान

अभिनेता शक्ती कपूरने मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. 

05:43 PM (IST) Nov 20

कुडाळ विधानसभा

कुडाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नितेश राणे यांनी मतदान केले आहे.

05:42 PM (IST) Nov 20

शाहरुख खान यांनी केले मतदान

शाहरुख खान यांनी कुटुंबासोबत मतदान केले आहे. 

05:41 PM (IST) Nov 20

मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन नीता अंबानी यांनी केले मतदान

मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन नीता अंबानी यांनी मतदान केले आहे. 

05:02 PM (IST) Nov 20

सलमान खान

सलमान खानने मतदानाचा हक्क बजावला आहे. 

05:01 PM (IST) Nov 20

महाराष्ट्र रेकॉर्ड 45.53

महाराष्ट्र रेकॉर्ड ४५.५३ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. 

04:33 PM (IST) Nov 20

सैफ अली खान याने मतदानाचा हक्क बजावला

सैफ अली खान याने मतदानाचा हक्क बजावला आहे, मुंबईमधील मतदानाच्या केंद्रावर त्याने मतदान केलं आहे

04:33 PM (IST) Nov 20

मुकेश अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावला

मुकेश अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

04:29 PM (IST) Nov 20

अरबाज खान याने मतदानाचा हक्क बजावला

अरबाज खान याने मतदानाचा हक्क बजावला आहे.

04:17 PM (IST) Nov 20

बीडच्या केज मतदारसंघातील विडा गावात मतदान केंद्राबाहेर दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

मतदान केंद्रा बाहेर तणाव पोलीस बंदोबस्त वाढवला..

बीडचा केज विधानसभा मतदारसंघात विडा गावामध्ये मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.. मतदान करण्यावरून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये शुल्लक कारणावरून ही हनामारी झाली. यानंतर काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता.. पोलिसांनी मध्यस्थी केली.. तसेच मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

04:14 PM (IST) Nov 20

सैफ अली खान याने मतदानाचा हक्क बजावला आहे, मुंबईमधील मतदानाच्या केंद्रावर त्याने मतदान केलं आहे

04:13 PM (IST) Nov 20

मुकेश अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

04:13 PM (IST) Nov 20

अरबाज खान याने मतदानाचा हक्क बजावला आहे.

02:58 PM (IST) Nov 20

संजय शिरसाट शिव्या देत असल्याचा अंबादास दानवेंचा दावा, व्हिडीओ ट्विट करत आरोप

अंबादास दानवे यांच्याकडून संजय शिरसाट यांचा आणखी एक व्हिडीओ ट्विट, संजय शिरसाट शिव्या देत असल्याचा अंबादास दानवेंचा दावा. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील प्रकार समोर.

02:56 PM (IST) Nov 20

ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघेंवर दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या वर्षा भोसले यांच्या तक्रारीनंतर दिघेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणुकीला उभे आहेत.

02:22 PM (IST) Nov 20

राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात

गडचिरोलीत ५०.८९ टक्के मतदान

सर्वात कमी मतदान मुंबई शहरात

मुंबई शहरात फक्त २७.७३ टक्के मतदान

 

02:18 PM (IST) Nov 20

बीडमध्ये घाटनांदूरमध्ये मतदान केंद्रावर तोडफोड

शरद पवार गटाच्या नेत्याला परळीत मारहाण झाल्यानंतर तणावाची स्थिती माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी घाटनांदुर या ठिकाणी मतदान केंद्रावर तोडफोड केली आहे. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदान केंद्रा मध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र फोडण्याची घटना घडली आहे काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आले आहे.

02:18 PM (IST) Nov 20

बीडमध्ये घाटनांदूरमध्ये मतदान केंद्रावर तोडफोड

शरद पवार गटाच्या नेत्याला परळीत मारहाण झाल्यानंतर तणावाची स्थिती माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी घाटनांदुर या ठिकाणी मतदान केंद्रावर तोडफोड केली आहे. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदान केंद्रा मध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र फोडण्याची घटना घडली आहे काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आले आहे.

02:08 PM (IST) Nov 20

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

अहमदनगर - ३२.९० टक्के,

अकोला - २९.८७ टक्के,

अमरावती - ३१.३२ टक्के,

औरंगाबाद- ३३.८९ टक्के,

बीड - ३२.५८ टक्के,

भंडारा- ३५.०६ टक्के,

बुलढाणा- ३२.९१ टक्के,

चंद्रपूर- ३५.५४ टक्के,

धुळे - ३४.०५ टक्के,

गडचिरोली-५०.८९ टक्के,

गोंदिया - ४०.४६ टक्के,

हिंगोली -३५.९७ टक्के,

जळगाव - २७.८८ टक्के,

जालना- ३६.४२ टक्के,

कोल्हापूर- ३८.५६ टक्के,

लातूर _ ३३.२७ टक्के,

मुंबई शहर- २७.७३ टक्के,

मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,

नागपूर - ३१.६५ टक्के,

नांदेड - २८.१५ टक्के,

नंदुरबार- ३७.४० टक्के,

नाशिक - ३२.३० टक्के,

उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,

पालघर-३३.४० टक्के,

परभणी-३३.१२टक्के,

पुणे - २९.०३ टक्के,

रायगड - ३४.८४ टक्के,

रत्नागिरी-३८.५२ टक्के,

सांगली - ३३.५० टक्के,

सातारा -३४.७८ टक्के,

सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,

सोलापूर - २९.४४,

ठाणे -२८.३५ टक्के,

वर्धा - ३४.५५ टक्के,

वाशिम - २९.३१ टक्के,

यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

 

01:43 PM (IST) Nov 20

दिग्दर्शन राकेश रोशन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

01:43 PM (IST) Nov 20

संगीतकार कैलास खेर याने मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याने मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केलं आहे.

01:42 PM (IST) Nov 20

शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केलं मतदान

शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ते वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत

01:05 PM (IST) Nov 20

वरळीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडलं

वरळीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. राज ठाकरे यांची खोटी सही असलेलं पत्र व्हायरल होत असल्याचा आरोप करण्यात आला. मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला होता.

12:14 PM (IST) Nov 20

सातारा जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती मतदान? सातारा जिल्ह्यातील 11 पर्यंतची सविस्तर टक्केवारी

फलटण मतदारसंघ - 17.98%

वाई मतदारसंघ - 18.55%

कोरेगाव मतदारसंघ - 21.24%

माण मतादारसंघ - 15.21%

कराड उत्तर मतदारसंघ - 18.57%

कराड दक्षिण मतदारसंघ- 19.71%

पाटण मतदारसंघ - 18.93%

सातारा विधानसभा - 19.97%

12:13 PM (IST) Nov 20

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे

अहमदनगर - १८.२४ टक्के,अकोला - १६.३५ टक्के,अमरावती - १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड - १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे - २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया - २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव - १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के,लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर - १८.९० टक्के,नांदेड - १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक - १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे - १५.६४ टक्के,रायगड - २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के,सांगली - १८.५५ टक्के,सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के,सोलापूर - १५.६४,ठाणे१६.६३

08:00 AM (IST) Nov 20

शिवसेना उमेदवार शायना एनसी यांनी केले मतदान

शिवसेना उमेदवार शायना एनसी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

07:48 AM (IST) Nov 20

भाजपा नेते आशिष शेलार यांनी मतदानाचा बजावला हक्क

भाजपा नेते आशिष शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

07:43 AM (IST) Nov 20

राजकुमार राव यांनी मुंबईत केले मतदान

राजकुमार राव यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. 

07:21 AM (IST) Nov 20

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत केले मतदान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत जाऊन मतदान केलं आहे. 


More Trending News