Konkan Railway: कोकण रेल्वेने कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये कायमस्वरूपी '3-टियर एसी इकॉनॉमी' डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे गाड्यांची आसनक्षमता वाढणार असून, प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल.
मुंबई : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे! कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि तिकीट मिळवण्यासाठी होणारी कसरत लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. आता कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे.
25
नेमका बदल काय?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणच्या प्रवाशांची लाडकी कोकणकन्या एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांमध्ये आता '3-टियर एसी इकॉनॉमी'चा एक अतिरिक्त डबा कायमस्वरूपी जोडला जाणार आहे. या निर्णयामुळे गाड्यांची एकूण आसनक्षमता वाढणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
35
आता कशी असेल गाडीची नवी रचना?
या बदलानंतर दोन्ही गाड्या आता २३ एलएचबी (LHB) डब्यांसह धावतील. यामध्ये खालीलप्रमाणे डब्यांची विभागणी असेल.
एसी श्रेणी: १ फर्स्ट एसीसह एसी-२, १ एसी-२ श्रेणी, ४ एसी-३ श्रेणी आणि ३ एसी-३ इकॉनॉमी श्रेणी.
शयनयान (Sleeper): ७ डबे.
सामान्य श्रेणी (General): ४ डबे.
इतर: १ पॅन्ट्री कार, १ जनरेटर कार आणि १ गार्ड ब्रेक व्हॅन.
रेल्वेने जाहीर केल्यानुसार, हा बदल खालील तारखांपासून अंमलात येईल.
कोकणकन्या एक्सप्रेस (20111): २५ फेब्रुवारीपासून नव्या डब्यासह धावणार.
कोकणकन्या एक्सप्रेस (20112): मडगाववरून २४ फेब्रुवारीपासून बदल लागू.
मांडवी एक्सप्रेस (10103/10104): २५ फेब्रुवारीपासून अतिरिक्त डब्यासह सेवेत दाखल होणार.
55
प्रवाशांना मिळणारा फायदा
होळी, गणपती, दिवाळी किंवा लग्नसराईच्या काळात कोकण रेल्वेवर प्रचंड ताण असतो. अनेकदा तिकीट वेटिंगवर असल्याने प्रवाशांचे हाल होतात. आता अतिरिक्त डब्यामुळे आरक्षणाची उपलब्धता वाढेल, ज्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.