IAS Tukaram Mundhe Transfer: 'सिंघम'ची पुन्हा बदली! २१ वर्षांत २४ वेळा गाशा गुंडाळला; तुकाराम मुंढेंवर आता 'ही' मोठी जबाबदारी

Published : Mar 31, 2026, 05:49 PM IST
Tukaram Mundhe

सार

IAS Tukaram Mundhe Transfer: डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांच्या सेवेत २४ व्यांदा बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागातून त्यांची आता आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे या नव्या विभागात ते कोणते बदल घडवतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई: महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळातील सर्वात चर्चेत असणारं नाव म्हणजे IAS तुकाराम मुंढे. नियमांचे पक्के आणि डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुंढे यांची सरकारने पुन्हा एकदा बदली केली आहे. अवघ्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत ही त्यांची २४ वी बदली असून, पुन्हा एकदा प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आता कोणती जबाबदारी मिळाली?

२००५ बॅचचे 'सिंघम' अधिकारी तुकाराम मुंढे यांची 'दिव्यांग कल्याण विभाग'च्या सचिव पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग या अत्यंत महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

'मुंढे स्टाईल' कारभार अन् सरकारची अडचण?

तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात, तिथे ते कामात शिस्त आणि पारदर्शकता आणतात. नुकत्याच सांभाळलेल्या दिव्यांग मंत्रालयातही त्यांनी वर्षानुवर्षे चालणारे गैरप्रकार रोखले होते. मात्र

राजकीय हस्तक्षेप न मानणे: नेते किंवा लोकप्रतिनिधींचा दबाव झुगारून थेट जनतेच्या हिताचे निर्णय घेणे ही त्यांची ओळख आहे.

नियमच सर्वोच्च: भ्रष्ट अधिकारी आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्यांची वचक असते.

सरासरी कार्यकाळ: नियमानुसार ३ वर्षे एका जागी काम अपेक्षित असताना, मुंढे यांची सरासरी वर्षभरातच बदली होते. हा एक प्रकारचा प्रशासकीय 'विक्रम'च ठरला आहे.

२४ बदल्यांचा थक्क करणारा प्रवास

सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी पदापासून सुरू झालेला हा प्रवास जालना, सोलापूरचे जिल्हाधिकारी, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूरचे महानगरपालिका आयुक्त असा अनेक वळणांवरून गेला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली, पण अनेकदा त्यांना लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागले.

IAS तुकाराम मुंढे यांचा २४ बदल्यांचा प्रवास

ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.

सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.

जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.

मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग.

जुलै 2009 - सीईओ, वाशिम.

जून 2010 - सीईओ, कल्याण.

जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना.

सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.

नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी.

मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.

फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका.

नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन.

डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.

जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका.

ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.

जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.

सप्टेंबर 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.

एप्रिल 2023 - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

जून 2023 - सचिव मराठी भाषा विभाग

जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव

जून 2024 - विकास आयुक्त, असंघटित कामगार विभाग

ऑगस्ट 2025- सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त मंत्रालय

आपत्ती व्यवस्थापन विभागात 'खळबळ' उडणार?

आगामी काळात आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन या संवेदनशील विभागात तुकाराम मुंढे काय 'धडाकेबाज' निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नैसर्गिक आपत्तींचा काळ जवळ येत असताना एका शिस्तप्रिय अधिकाऱ्याकडे ही धुरा सोपवल्याने विभागात आता 'मुंढे स्टाईल' शिस्त पाहायला मिळेल, अशी चर्चा आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक