Mumbai Rain : मुंबईत पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह पाऊस

Published : Jun 22, 2026, 11:41 AM IST
Mumbai Rain Update

सार

मुंबईत महापालिकेकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाचा संदर्भ देत मुंबईत पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण, मराठवाड्यातील पावसाचा अंदाजही IMD कडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई : राज्यभरात पावसाने अद्याप दमदार हजेरी लावलेली नाही. पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना कडाक्याचा उकाडा सहन करावा लागतो आहे. पावसाने विलंब केला असल्याने अनेक पेरण्याही रखडल्या आहेत. अशात आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभाग अर्थात IMD चा संदर्भ देत मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अंदाजानुसार, पुढील काही तासांत, मुंबईतील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ, तसंच मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रभरात कुठे-कसा आहे पावसाचा अंदाज?

मुंबईत मान्सूनचं आगमन आज सोमवारी किंवा उद्या मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून आगमनासाठी संपूर्ण निकष पूर्ण झाल्यानंतरच भारतीय हवामान विभागाकडून मुंबईतील मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यात २१ आणि २२ जून रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २३ ते २७ जून या काळात कोकणासह गोव्यातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तो सर्वदूर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IMD च्या अंदाजानुसार कोकण, तसंच मराठवाड्यातील काही भागात २२ ते २५ जून या काळात विजांचा कडकडाट होऊन ताशी ४० ते ५० किमीपर्यंत वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच २२ जून ते २७ जून दरम्यान कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

देशभरातील पावसाची परिस्थिती काय?

मान्सूनची यंदाच्या 2026 च्या भारताच्या नैऋत्य भागात मोसमी पावसाच्या हंगामाची सुरुवात अतिशय कमकुवत झाली. अशात आता हवामान विभागाच्या अहवालानुसार, नैऋत्य मान्सूनचा महाराष्ट्रासह, ओडिशा, बिहार, झारखंड, तेलंगणा या भागात २३ जूनच्या जवळपास पुढील प्रवास होण्यासाठीची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, २५ जूनपर्यंतच्या या काळात ईशान्य भारतात, तर २२ जूनपर्यंत सिक्कीम, पश्चिम बंगाल या भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक