आजपासून चार दिवस विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरींचे अलर्ट

Published : May 03, 2025, 07:27 AM IST
rain

सार

राज्यातील बहुतांश भागांत आजपासून (३ मे) चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर दुसरीकडे राज्यात उन्हाची तिव्रता कमी झालेली नाही.

मुंबई - राज्यातील बहुतांश भागांत आजपासून (३ मे) चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर दुसरीकडे राज्यात उन्हाची तिव्रता कमी झालेली नाही.

राज्यात उष्णतेच्या लाटा दिसून येत आहेत. शुक्रवारी अकोला, जळगाव, सोलापूर येथील कमाल तापमान 44, तर पुणे शहरात यंदाच्या मे महिन्यातील विक्रमी 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, उत्तर भारतात आणि जम्मू आणि काश्मिरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. तसेच उष्ण हवामानापासून किंचित दिलासाही मिळाला आहे. उत्तर भारतात तापमान कमी झाल्याने आता महाराष्ट्रातही पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शहरांमधील शुक्रवारचे कमाल तापमान

अकोला 44.5, जळगाव 44.2, सोलापूर 44.1, पुणे (लोहगाव 43, शिवाजीनगर 41.2), मुंबई (कुलाबा) 34.1, सांताक्रूझ 33.9, अलिबाग 35.7, रत्नागिरी 33.5, कोल्हापूर 38.5, महाबळेश्वर 33.1, मालेगाव 42.2, नाशिक 40, सांगली 41, सातारा 41.2, धाराशिव 42.4, छ. संभाजीनगर 42, परभणी 41.6, बीड 42.9, अमरावती 42.8, बुलडाणा 40.8, ब्रह्मपुरी 42.2, चंद्रपूर 41.8, गोंदिया 37.9, नागपूर 41.6, वाशिम 42.असे आहेत पावसाचे यलो अलर्ट

असे आहेत अलर्ट

कोकण (5 ते 8 मे)

मध्य महाराष्ट्र (3 ते 8 मे)

मराठवाडा (3 ते 8 मे)

विदर्भ (3 ते 6 मे)6, वर्धा 42.1, यवतमाळ 41.6.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक