पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले?, जाणून घ्या

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले आणि जनतेचे आभार मानले. महायुतीच्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आणि विकास कामांना दिले.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल अनेकांनी सस्पेन्स घेतला होता की, एकनाथ शिंदे आता काय बोलणार? अखेर त्यांनी सर्व जनतेला आभार मानले आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतली तो आम्हाला मान्य आहे. आमची कोणतीही नाराजी नाही.यावेळी त्यांनी सांगितले की, मी नाराज होणारा माणूस नाही. सरकार बनवण्यासाठी आमच्या बाजूने कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच मी आपल्यासमोर आलो आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांना आणि जनतेला मनापासून धन्यवाद देतो. याच कारणामुळे, आम्हाला या निवडणुकीत लँडस्लाईड विजय मिळालाय. इतक्या मोठ्या प्रमाणात इतका विजय मिळवणं ही गेल्या अनेक वर्षांत घडलेली अत्यंत महत्त्वाची घटना आहे. महायुतीने अडीच वर्षात जे काम केलं, त्यावर लोकांनी विश्वास दाखवला. त्या विश्वासावर आधारित, विकासाच्या कामांमध्ये जी गती महाविकास आघाडीने थांबवली होती, ती आम्ही पुन्हा चालवली. आज त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. यामध्ये जातववादाचा मुद्दा न आणता, आम्ही कल्याणकारी योजना आणि विकासाचा एकत्रित पाया घातला. त्यामुळेच हा विजय शक्य झाला", असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“हा विजय जनतेचा आहे. महायुतीचे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेत होते. मी स्वतः पहाटेपर्यंत काम करत होतो. दोन ते तीन तासांच्या झोपेनंतर मी सभा घेत होतो. निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी ८० ते ९० सभा घेतल्या. मोठ्या प्रमाणात प्रवास केला. कार्यकर्त्यांसारखेच मीही कार्य करत होतो. मी मुख्यमंत्री म्हणून नाही, तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यामुळे प्रोटोकॉलला महत्त्व न देता, मी जनतेसाठी काहीतरी करावं अशी भावना नेहमी माझ्या मनात होती", असं ते म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्याने महायुतीच्या विजयाची खोली आणि कार्यकर्त्यांची मेहनत स्पष्ट केली, तसेच विकासाच्या गतीला चालना दिली.

 

Read more Articles on
Share this article