
मुंबई : राज्य शासनाने बुधवारी रात्री उशिरा पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत प्रशासकीय पातळीवर मोठी हालचाल केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे निर्णय घेण्यात आले.
या बदल्यांमध्ये विशेष लक्ष वेधून घेणारे नाव आहे. जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे उपोषण अत्यंत संयमाने आणि कौशल्यपूर्णपणे हाताळल्यामुळे चर्चेत आलेले पांचाळ यांची बदली ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्षेत्रातील जिल्हा असल्याने ही नियुक्ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
श्रीकृष्णनाथ पांचाळ
पूर्व पद: जिल्हाधिकारी, जालना
नवीन पद: जिल्हाधिकारी, ठाणे
मनोज जरांगेंच्या उपोषणात प्रशासनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यामुळे बदली ठाण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात.
अजीज शेख
पूर्व पद: व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई
नवीन पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे
अशीमा मित्तल
पूर्व पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
नवीन पद: जिल्हाधिकारी, जालना
श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या जागी जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
विकास खारगे
पूर्व पद: मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
नवीन पद: अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई
मुख्यमंत्री कार्यालयातील विश्वासू अधिकारी आता महसूल खात्याच्या जबाबदारीवर.
अनिल डिग्गीकर
पूर्व पद: अपर मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग
नवीन पद: अपर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
विविध खात्यांचा अनुभव असलेल्या डिग्गीकर यांच्याकडे आता पुरवठा विभागाची धुरा.
या बदल्यांमुळे राज्य प्रशासनात एक नवा बॅलन्स साधला गेला आहे, असे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. हे निर्णय आगामी धोरणात्मक कामगिरीसाठी महत्त्वाचे ठरतील, अशी अपेक्षा आहे.