शरद पवारांबाबत बाबाजानी दुर्राणींचे मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या

Babajani Durrani on Sharad Pawar : छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

Babajani Durrani on Sharad Pawar : शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत. ते शून्य झाले, बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो, असे विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले. बाबाजानी दुर्राणी यांनी शनिवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी घनसावंगीचे आमदार राजेश टोपेही उपस्थित होते.

'शरद पवारांकडे मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षेने पाहतोय' : आमदार बाबाजानी दुर्राणी

गेल्या 10 वर्षात देशात जातीवाद पसरवला. शरद पवार यांच्याकडे आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहात आहे. जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे. मला देखील खंत वाटते मी साहेबांना का सोडले? लोकसभा निवडणूक लोकांनी भाजपविरोधात हातात घेतली होती. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो तरीही आतून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली. मुस्लिम समाजाचे उलमा यांचा दबाव होता की शरद पवार गटासोबत राहायला पाहिजे. असे बोलताना बाबाजानी दुर्रानी म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात सत्तापरिवर्तन होणार : आमदार राजेश टोपे

शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जी जबाबदारी मी मजबूतीने पार पाडील. लोकसभेच्या 10 पैकी 8 जागा आपण जिंकलो. दोन जागा चिन्हामुळे जिंकता आल्या नाहीत. जे नेते भारतीय जनता पक्षासोबत गेले त्यांना मदत करण्याची लोकांची मानसिकता नाही. ज्या माणसामुळे मी आमदार झालो त्यांच्यासोबत येण्याची संधी मला मिळाली. असे आमदार राजेश टोपे यावेळी बोलताना म्हणालेत.

महाविकास आघाडीची सत्ता आलीच पाहिजे असं प्रास्तविक शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत केलं. 15 लाख चुनाव जुमला असल्याचे शहा म्हणाले होते. मग लाडकी बहीण योजना चुनावी जुमला नाही का? सर्व सामान्य लोकांच्या कराच्या पैशातून ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे बॅनर लावून महिलांना या योजनेचा फायदा मिळवून द्यावा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

आणखी वाचा : 

बाबाजानी दुर्राणींनी का सोडली अजित पवारांची साथ?, शरद पवारांची तुतारी फुंकणार

 

Share this article