Baramati Rahuri Assembly Bypoll Election: महाराष्ट्रात निवडणुकीचा धुरळा! बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; 'या' दिवशी होणार मतदान!

Published : Mar 15, 2026, 05:33 PM IST
vote

सार

Baramati Rahuri Assembly Bypoll Election: अजित पवार, शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाच्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

निवडणुकीचा महत्त्वाचा घटनाक्रम

देशातील इतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील या दोन पोटनिवडणुका पार पडणार आहेत.

मतदान तारीख: २३ एप्रिल

निकाल (मतमोजणी): ४ मे

बारामती: सुनेत्रा पवार रिंगणात; निवडणूक बिनविरोध होणार?

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली होती. सध्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांना सहा महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (AP) सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागली आहे. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, अजित पवारांच्या निधनामुळे आदरांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दाट आहे.

राहुरी: कर्डिलेंच्या वारसदाराला संधी मिळणार?

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. या जागेवर आता भाजपकडून कोणाला तिकीट मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या निवडणुकीत काय भूमिका घेतात, यावर राहुरीची निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची ठरणार, हे स्पष्ट होईल.

राजकीय समीकरणे आणि पेच

निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यामुळे दोन्ही मतदारसंघांत आचारसंहिता लागू झाली आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे संकेत अनेक पक्षांनी दिले असले, तरी राहुरीमध्ये मात्र चुरस पाहायला मिळू शकते.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mahindra Thar: स्वप्नातली थार घेण्यासाठी काकांचेच दागिने चोरले, अन् त्यांच्याच हस्ते केली गाडीची पूजा!
Pune Viral Video : पुण्यात आयटी इंजिनिअर महिलेला बाईक टॅक्सी चालकाने अर्ध्या रस्त्यात उतरवले