Most Expensive Water : या एका पाण्याच्या बाटलीची किंमत तब्बल 50 लाख रुपये

Published : Oct 16, 2026, 11:53 AM IST

जगातल्या सर्वात महागड्या पाण्याच्या बाटलीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? यात फक्त पाणी नाही, तर चक्क सोनं मिसळलेलं असतं. ५० लाख रुपये किंमत असलेली ही बाटली विकत घेणं फक्त अंबानी किंवा अदानींसारख्या अब्जाधीशांनाच शक्य आहे. पण या पाण्यात असं आहे तरी काय?

PREV
13
बाटलीत फक्त ७५० मिलीलीटर पाणी
आपण सहसा दुकानातून २०-३० रुपयांची पाण्याची बाटली विकत घेतो. पण जगात चक्क ५० लाख रुपयांची पाण्याची बाटली अस्तित्वात आहे. 'अक्वा दी क्रिस्टालो ट्रिब्युटो अ मोदिग्लियानी' (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) असं या बाटलीचं नाव आहे. २०१० मध्ये या बाटलीने जगातल्या सर्वात महागड्या पाण्याच्या बाटलीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. आजतागायत हा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेलं नाही. या बाटलीत फक्त ७५० मिलीलीटर पाणी असतं.
23
पाण्यात ५ ग्रॅम सोनं मिसळलेलं असतं
या बाटलीची एवढी किंमत असण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तिची डिझाईन आणि त्यात वापरलेलं सोनं. प्रसिद्ध कलाकार फर्नांडो अल्तामिरानो यांनी माणसाच्या चेहऱ्याच्या आकारात ही बाटली डिझाईन केली आहे. बाटलीचं बाह्य आवरण २४ कॅरेट शुद्ध सोन्यापासून बनवलं आहे. एवढंच नाही, तर आतल्या पाण्यातही ५ ग्रॅम शुद्ध सोनं मिसळलेलं असतं. यातलं पाणी साधंसुधं नसून फिजी, आईसलँड आणि फ्रान्समधल्या हिमनद्यांमधून अत्यंत कष्टाने गोळा केलेलं असतं.
33
जगभरात महागड्या बाटलीची चर्चा
ही बाटली तुम्हाला साध्या बाजारात मिळणार नाही. श्रीमंत लोकांसाठी खास ऑर्डरवरच ती बनवली जाते. कधीकधी या बाटल्यांचा लिलाव करून आलेले पैसे ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याच्या कामासाठी वापरले जातात. काही दिवसांपूर्वी नीता अंबानी हीच बाटली हातात घेऊन पाणी पीत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. पण तो फोटो मॉर्फ केलेला असून खोटा असल्याचं रिलायन्स कंपनीने स्पष्ट केलं होतं. तरीही, या महागड्या बाटलीची जगभरात नेहमीच चर्चा असते.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories