Expensive Almonds : जगातल्या सगळ्यात महागड्या बदामाचा दर ऐकून थक्क व्हाल, काय आहे यात खास?

Published : Oct 30, 2026, 12:48 PM IST

जगातल्या सर्वात महागड्या बदामाला 'ममरा' (Mamra Badam) म्हणतात. भारतात या बदामाचा भाव २,८०० ते ४,५०० रुपये किलो आहे. या बदामात नक्की असं काय खास आहे?

PREV
15
जगातला सगळ्यात महागडा बदाम, भाव ऐकून थक्क व्हाल

कॅलिफोर्निया बदाम बाजारात ८ ते १२ डॉलर किलोने मिळतो. मात्र इराण आणि अफगाणिस्तानात होणारा ममरा बदाम ४० ते ८० डॉलर प्रति किलोच्या दराने विकला जातो.

25
ममरा बदाम नक्की का खास मानतात?

ममरा बदाम होडीसारखा वळलेला असतो. यात ५० टक्क्यांहून अधिक नैसर्गिक तेल असते. यामुळे हा बदाम अत्यंत स्वादिष्ट आणि व्हिटॅमिन ई ने भरपूर असतो.

35
हा बदाम इतका महाग का विकतात?

जगातील एकूण उत्पादनापैकी फक्त ५ टक्केच ममरा बदाम पिकतो. इराण, अफगाणिस्तान आणि काश्मीरमध्ये शेतकरी हा बदाम हाताने तोडतात. त्यामुळे याचे उत्पादन खूप कमी असते.

45
आयुर्वेद आणि औषधांमध्ये मोठी मागणी

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि शारीरिक ताकदीसाठी आयुर्वेदात ममरा बदाम वापरतात. गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी हा बदाम उत्तम टॉनिक मानतात.

55
बदामाचे इतर प्रकार कोणते?

स्पेनमधील मार्कोना बदाम 'क्वीन ऑफ आल्मंड्स' म्हणून ओळखतात. तर अफगाणिस्तानातील गुरबंदी बदाम थोडा कडू-गोड असतो. पण चव आणि गुणधर्मात ममरा बदामच सर्वांत पुढे आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories