हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. यासाठी अनेकजण महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. पण पैसे वाया न घालवता स्वयंपाकघरातील हे साधे सोपे उपाय करून पाहा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल.
हिवाळा आला की त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे, जळजळ होणे अशा समस्या सुरू होतात. यासाठी महागडे लोशन्स किंवा क्रीम्स आणायची गरज नाही. घरात रोज वापरल्या जाणाऱ्या ५ प्रकारच्या डाळींपासून तुम्ही फेसपॅक बनवू शकता. चला तर मग पाहूया ते कोणते आहेत.
27
मुगाची डाळ
मुगाची डाळ फक्त स्वयंपाकासाठीच नाही, तर त्वचेच्या सौंदर्यासाठीही वापरली जाते. मुगाची डाळ बारीक वाटून त्यात थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण तुम्ही फेसपॅक म्हणून लावू शकता. मुगाच्या डाळीची पावडर मऊ असल्याने तिची पेस्ट सहज तयार होते. पण चेहऱ्यावर लावताना ती जास्त घासू नका, नाहीतर त्वचेला त्रास होऊ शकतो.
37
उडीद डाळ
इडली, डोसा बनवण्यासाठी वापरली जाणारी उडीद डाळ सौंदर्यासाठीही वापरली जाते. उडीद डाळ थोडा वेळ भिजत ठेवून बारीक वाटल्यास तिची क्रीमसारखी पेस्ट तयार होते. घरगुती उटण्यात याचा वापर केला जातो. हिवाळ्यात त्वचा आधीच कोरडी असते, त्यामुळे ही पेस्ट बनवताना त्यात जास्त पदार्थ मिसळू नका.
तूर डाळ प्रत्येकाच्या घरात असते. याचा वापर फेसपॅक म्हणूनही करता येतो. तूर डाळ बारीक वाटून पाण्यात मिसळून तिची पेस्ट बनवा. जे नवीन फेसपॅक ट्राय करू पाहतात, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
57
हरभरा डाळ
बेसनपासून फेसपॅक बनवला जातो हे बहुतेकांना माहीत आहे. त्याचप्रमाणे हरभरा डाळही बारीक वाटून फेसपॅकसाठी वापरता येते. पण पावडर किती बारीक आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
हरभरा डाळ जाडीभरडी वाटल्यास तिचे कण त्वचेला ओरखडू शकतात. त्यामुळे याचा वापर स्क्रब म्हणून करू नका. बारीक वाटलेले मिश्रण फेसपॅक म्हणून वापरा आणि थोड्या वेळानंतर पाण्याने धुऊन टाका. चेहरा धुतल्यावर त्वचा कोरडी पडू नये म्हणून मॉइश्चरायझर नक्की लावा.
67
मसूर डाळ
लाल मसूर डाळीचा वापर उटणे बनवण्यासाठीही केला जातो. ही डाळ तुम्ही बारीक वाटून किंवा भिजवून तिची पेस्ट बनवू शकता. फेसपॅक बनवण्यासाठी ही डाळ उत्तम आहे. पण मसूर डाळीची पावडर जाडीभरडी असल्यास चेहऱ्यावर घासताना त्वचेला नुकसान होऊ शकतं. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि संवेदनशील असते, त्यामुळे जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.
77
हिवाळ्यात त्वचेची खरी काळजी कशी घ्यावी?
घरगुती फेसपॅक चांगले असतात, पण ते संपूर्ण स्किन केअर रुटीनचा पर्याय होऊ शकत नाहीत. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी पाळणं आवश्यक आहे. त्वचा कोरडी पडणार नाही असा माइल्ड क्लिन्झर वापरा. चेहरा धुतल्यावर लगेच मॉइश्चरायझर लावा. साध्या लोशनपेक्षा घट्ट क्रीम किंवा मलई जास्त फायदेशीर ठरू शकते. तसेच खूप वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं टाळा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.