Mumbai Rains वरळी भूयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरले, सर्वत्र चिखलाचा थर, सेवा ठप्प

Published : May 26, 2025, 02:30 PM ISTUpdated : May 26, 2025, 02:35 PM IST
Mumbai metro

सार

वरळी आरे मार्गावरील मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानची सेवा ठप्प झाली आहे.

मुंबई : राजधानी मुंबईत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नव्याने सुरू झालेल्या भुयारी मेट्रो स्थानकातही पाणी शिरल्याने खळबळ उडाली आहे. वरळी आरे मार्गावरील मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानची सेवा ठप्प झाली आहे.

तांत्रिक अडचणींमुळे प्रवासी त्रस्त

मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सेवा तांत्रिक कारणांमुळे थांबवण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रकारामुळे हजारो प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. चिखलमय प्लॅटफॉर्म आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

कोट्यवधींच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

नुकतेच काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या या भुयारी मेट्रो प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तरीही सुरुवातीलाच अशा प्रकारे पाणी साचण्यामुळे प्रकल्पाच्या गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

माध्यम प्रतिनिधींशी अरेरावी

या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही माध्यम प्रतिनिधींना घटनास्थळी अडवण्यात आले. तसेच, त्यांच्याशी प्रशासनाच्या काही कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामुळे मेट्रो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका सुरू झाली आहे.

 

 

भुयारी मेट्रो प्रकल्पाची माहिती

‘अ‍ॅक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेट्रो मार्गाची एकूण लांबी ३३ किमी असून, धारावी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) हा ९.६९ किमीचा टप्पा नुकताच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. या प्रकल्पाची उभारणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) करत असून, केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्तरीत्या निधी पुरवला जात आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा — आरे जेव्हीएलआर ते बीकेसी — ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झाला होता.

मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर

दरम्यान, मान्सून आता तळकोकणात दाखल झाला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईतही दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याअनुषंगाने कोकण किनारपट्टीवर आणि मुंबई शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरात ढगाळ हवामान आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शहरातील पायाभूत सुविधा पावसात फेल?

मेट्रो स्थानकात पाणी साचणे ही एकमेव घटना नसून, शहरातील अनेक भागांत जलजमाव झाल्याने रस्ते आणि वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. अशा घटनांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाचे नियोजन आणि सज्जतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

आत्याचं स्पेशल गिफ्ट! 2 ते 5 हजारात भाचीसाठी खरेदी करा सर्वात सुंदर चांदीचे पैंजण!
वधू होणार खुश! फक्त 10,000 मध्ये खरेदी करा हे 'युनिक' आणि भारी पैंजण डिझाईन्स!