आपल्यापैकी अनेकांच्या घरात खोलीच्या किंवा मुख्य दरवाज्यामागे खिळा ठोकून शर्ट, पँट, टॉवेल, जॅकेट, बॅग अडकवण्याची सवय असते. जागेअभावी किंवा रोजच्या वापरासाठी सोयीचे असल्याने लोक ही सवय ठेवतात.
पण, अनेकदा आपल्या या छोट्या सवयीच घरातील शांती आणि प्रगतीवर मोठा परिणाम करतात. वास्तू शास्त्रानुसार, घराच्या दरवाज्यामागे कपडे अडकवणे चांगले नाही, असा इशारा तज्ञ देतात. याची कारणे सविस्तर…..
24
आर्थिक प्रगती आणि जीवनातील ओझे
घराच्या उंबरठ्यावर देवी लक्ष्मी वास करते, अशी मान्यता आहे. दरवाज्यामागे वापरलेले, घाणेरडे किंवा फाटलेले कपडे अडकवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आर्थिक अडचणी आणि कर्जाचा डोंगर वाढू शकतो. तसेच, सतत हलणाऱ्या दरवाजावर वजन ठेवणे हे जीवनातील ओझे वाढवण्यासारखे आहे, असे म्हटले जाते. यामुळे घरातील सदस्यांचे नातेसंबंध, कार्यक्षमता आणि समृद्धीवर वाईट परिणाम होऊन ताणतणाव आणि मतभेद वाढू शकतात.
34
आरोग्य आणि वैज्ञानिक कारणे
केवळ वास्तूच्या दृष्टीनेच नाही, तर व्यावहारिक जीवनातही दरवाज्यामागे कपडे अडकवणे योग्य नाही. ओले किंवा घामाने भिजलेले कपडे दरवाज्याच्या आडोशाला अडकवून ठेवल्याने, हवा खेळती न राहिल्याने दुर्गंधी आणि बॅक्टेरिया निर्माण होतात. यामुळे कुटुंबाचे आरोग्य बिघडते. जड कपडे अडकवल्याने, दरवाजाचे बिजागरी वजन सहन न झाल्यामुळे लवकर तुटण्याची शक्यता असते. तसेच घराचे सौंदर्यही बिघडते.
44
यावर सोपा उपाय काय?
घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहण्यासाठी वास्तू तज्ञांनी दिलेले महत्त्वाचे सल्ले -
दरवाज्यामागची जागा नेहमी स्वच्छ आणि रिकामी ठेवणे चांगले.
कपडे ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाट किंवा वॉर्डरोब वापरा.
जागेची कमतरता असल्यास, दरवाज्याऐवजी खोलीच्या पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर हँगर लावता येतील.
धुवायचे घाणेरडे कपडे झाकण असलेल्या लाँड्री बास्केटमध्ये ठेवणे वास्तू आणि आरोग्य या दोन्हीसाठी खूप चांगले आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.