Summer Skincare : उन्हाळा सुरू झाला की घरात उकाडा आणि बाहेर पडलं की कडक ऊन. सूर्यकिरणं थेट त्वचेवर पडल्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते. काहींना पुरळ उठतं किंवा त्वचा लाल पडते. म्हणूनच, आपलं स्किन केअर रुटीन थोडं बदलणं गरजेचं आहे.
उन्हाळ्यात डिहायड्रेशन, डोकेदुखी, उन्हामुळे चक्कर येणं, त्वचेच्या समस्या, केसातला कोंडा वाढणं यासारख्या गोष्टी सर्रास होतात. त्यामुळे अनेकजण घराबाहेर पडायलाही घाबरतात. पण बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही, मग अशावेळी कोणती काळजी घ्यायची? सूर्यप्रकाश, घाम आणि प्रदूषणामुळे त्वचा कोरडी पडते, टॅन होते, पिगमेंटेशन आणि ब्रेकआउट्ससारख्या समस्या येतात. म्हणूनच तज्ज्ञ काळजी घेण्याचा सल्ला देतात.
26
उन्हाळ्यातील स्किन केअर टिप्स
सर्वात आधी, सन प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज बाहेर जात नसाल तरीही सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. कमीत कमी SPF 30 किंवा त्याहून जास्त असलेलं सनस्क्रीन वापरा. जास्त वेळ बाहेर असाल, तर दर दोन तासांनी ते पुन्हा लावा. अनेकजण कान, मान आणि हातांसारख्या भागांना विसरतात. सूर्यकिरणांमुळे या भागांनाही नुकसान पोहोचतं. सोबतच, टोपी, सनग्लासेस आणि कॉटनचे कपडे घालणं चांगलं.
36
त्वचा डिहायड्रेट होऊ देऊ नका
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणं चांगलं. कोरफडीसारखे (Aloe Vera) हायड्रेटिंग घटक असलेले मॉइश्चरायझर वापरा. टरबूज, काकडी आणि संत्री यांसारखी जास्त पाणी असलेली फळं खाणं त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.
एक्सफोलिएशन गरजेचं आहे, पण ते अगदी सौम्यपणे करायला हवं. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा माइल्ड एक्सफोलिएटर वापरल्यास डेड स्किन निघून जाते आणि त्वचा मुलायम होते. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही जास्त वेळ उन्हात असाल, त्या दिवशी लगेच एक्सफोलिएट करणं टाळा.
56
सनस्क्रीन लावणं गरजेचं
घाम, सनस्क्रीन आणि धुळीमुळे त्वचेची लहान छिद्रं बंद होऊ शकतात. त्यामुळे दिवसातून दोनदा सौम्य क्लिन्झरने चेहरा धुवा. जास्त वेळा चेहरा धुतल्यास त्वचा कोरडी होऊ शकते. उन्हाळ्यात हेवी क्रीम्सऐवजी लाईट जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. ऑइल-फ्री आणि नॉन-कॉमेडोजेनिक (non-comedogenic) प्रोडक्ट्स निवडा. डोळ्यांभोवतीची आणि ओठांची त्वचा खूप संवेदनशील असते. UV प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस वापरा. SPF असलेलं लिप बाम लावा. तसेच, गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा कोरडी होत नाही. थंड पाण्याने आंघोळ करणं तर आणखी उत्तम!
66
छोटे बदल करून मिळवा हेल्दी, ग्लोइंग त्वचा
योग्य आहारसुद्धा स्किन केअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. व्हिटॅमिन सी, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ खाल्ल्याने त्वचा आतून निरोगी राहते. हे छोटे बदल केल्यास, तुमची त्वचा उन्हाळ्यातही हेल्दी आणि ग्लोइंग दिसेल.