तुम्ही कमी वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहात का? पांढरे केस लपवण्यासाठी तुम्ही सतत हेअर कलर वापरताय? आता या समस्येपासून सुटका मिळवा. एका नैसर्गिक उपायाने तुमचे पांढरे केस पुन्हा काळेभोर होऊ शकतात.
आजकाल अनेक तरुण कमी वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. वयाची ३० वर्षे पूर्ण होण्याआधीच केस गळणे आणि पांढरे होणे खूप सामान्य झाले आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अनेकजण मेहंदी किंवा केमिकल डाय वापरतात. यामुळे तात्पुरता रंग मिळतो, पण केसांचे मोठे नुकसान होते. निसर्गात उपलब्ध असलेल्या एका खास पानाचा वापर केल्यास तुमचे पांढरे केस पुन्हा काळेभोर आणि चमकदार होतील. शिवाय केस गळणेही पूर्णपणे थांबेल. हे पान कोणते आणि ते कसे वापरायचे?
23
शेवग्याच्या पानांमधील पोषक घटक
केसांच्या समस्या दूर करण्यासाठी निसर्गाने दिलेले एक उत्तम वरदान म्हणजे शेवग्याची पाने (Moringa Leaves). सहज उपलब्ध होणारी ही पाने केस गळतीच्या अनेक समस्या कमी करतात. अनेकजण शेवग्याच्या पानांचा वापर फक्त स्वयंपाकापुरता मर्यादित ठेवतात. पण केसांच्या वाढीसाठी हे एक दिव्य औषध म्हणून काम करते.
केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात असतात:
व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स - हे घटक केस पांढरे होण्यापासून रोखतात आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
अमिनो ॲसिड आणि बायोटिन - हे केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि नवीन केस वेगाने वाढण्यास मदत करतात.
ओमेगा-३ फॅटी ॲसिड, झिंक आणि आयर्न - हे घटक केस गळणे थांबवतात आणि टाळूला योग्य पोषण देतात.
33
अकाली केस पांढरे होण्याची समस्या हळूहळू कमी होऊ शकते
शेवग्याच्या पानांचे तेल: सर्वात आधी शेवग्याची पाने सावलीत वाळवून त्याची बारीक पावडर तयार करा. खोबरेल तेल, एरंडेल तेल किंवा आवळ्याच्या तेलात ही पावडर मिसळून केसांना लावा. किंवा तुम्ही थेट तेलात शेवग्याची पाने उकळूनही हेअर ऑइल तयार करू शकता. या तेलाचा नियमित वापर केल्याने अकाली केस पांढरे होण्याची समस्या हळूहळू कमी होते.
शेवग्याचा पॉवर पॅक - ताज्या दह्यामध्ये शेवग्याच्या पानांची पावडर मिसळा. त्यात थोडे गुलाबपाणी आणि तांदूळ धुतलेले पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाळूला आणि केसांच्या मुळांना लावा आणि थोड्या वेळानंतर केस धुवा. हा उपाय वारंवार केल्याने केस दाट आणि मऊ (सिल्की) होतात.
केवळ वरून लेप लावण्यासोबतच, तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश केला पाहिजे. यामुळे शरीराला आतून पोषण मिळते आणि केसांचे आरोग्य सुधारते.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.