शनी हा हळू चालणारा ग्रह आहे, जो कर्म, न्याय, शिस्त आणि दीर्घकालीन परिणामांसाठी ओळखला जातो. शनीच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. दृक पंचांगानुसार, 20 जानेवारी 2026 रोजी शनी पूर्वा भाद्रपदातून उत्तरा भाद्रपदामध्ये प्रवेश करेल. शनी स्वतः उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे, म्हणजेच या संक्रमणादरम्यान शनी स्वतःच्या नक्षत्रात असेल.