
Redmi Note 15 Pro Series India Launch Date Leaked : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने अलीकडेच युरोपसह काही जागतिक बाजारपेठांमध्ये आपली रेडमी नोट 15 सीरिज सादर केली होती. पण रेडमी नोट 15 प्रो सीरिज अद्याप भारतात उपलब्ध झालेली नाही. रेडमी नोट 15 प्रो सीरिज भारतीय बाजारात कधी येणार? ताज्या माहितीनुसार, 2026 जानेवारी महिन्याच्या अखेरीस रेडमी नोट 15 प्रो सीरिजचे स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होतील. एका टिपस्टरने X वर दावा केला आहे की, रेडमी नोट 15 प्रो सीरिज भारतात 27 जानेवारीला लाँच होईल. या स्मार्टफोन मालिकेत रेडमी नोट 15 प्रो आणि रेडमी नोट 15 प्रो+ यांचा समावेश आहे.
शाओमीच्या आगामी रेडमी नोट 15 प्रो मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 चिपसेट अपेक्षित आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम असेल. 6.83-इंचाच्या अमोलेड डिस्प्लेमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असेल आणि बेझल्स कमी असतील. कॅमेरा विभागात 50MP वाइड अँगल मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, एलईडी फ्लॅश आणि 30 एफपीएसवर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. 45 वॅट फास्ट चार्जिंगसह 7000 एमएएच बॅटरीची अपेक्षा आहे. 5G सपोर्ट असलेल्या रेडमी नोट 15 प्रो ची किंमत किती असेल हे अद्याप स्पष्ट नाही. रेडमी नोट 15 प्रो+ फोनची किंमतही अद्याप समोर आलेली नाही.
अलीकडेच रेडमी नोट 15 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला होता. 3,200 निट्स आणि 120 हर्ट्झ वैशिष्ट्यांसह 6.77-इंचाचा कर्व्ह्ड अमोलेड डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेट, यूएफएस 2.2 स्टोरेज, 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा, 30 फ्रेम्स प्रति सेकंदात 4K रेकॉर्डिंग, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 5,520 एमएएच बॅटरी आणि 45 वॅट फास्ट चार्जिंग ही रेडमी नोट 15 5G ची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रेडमी नोट 15 च्या 8 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आणि 8 जीबी/256 जीबी मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे.