रामायण सिनेमा रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर रावणाची जोरदार चर्चा सुरू आहे. रावणाचा जन्म भारतात झाला, मग तो लंकेचा राजा कसा बनला? सावत्र भाऊ कुबेरासोबत त्याचा काय वाद होता? जाणून घ्या यामागची रंजक कथा.
रामायणातील रावण हे एक अत्यंत शक्तिशाली आणि वादग्रस्त पात्र आहे. सीतेचे अपहरण आणि रामाच्या हातून झालेला मृत्यू या गोष्टी सर्वांनाच माहिती आहेत. पण रावणाचा जन्म भारतात झाला होता, हे फार कमी लोकांना माहिती आहे. एका महान ब्राह्मण कुळात जन्मलेल्या रावणाने आपल्या कठोर तपश्चर्येच्या बळावर लंका जिंकली आणि तो तिथला राजा बनला. त्याचा हा प्रवास खूपच रंजक आहे.
25
अशी होती रावणाची फॅमिली
ब्रह्मदेवाचा नातू 'विश्रवा महर्षी' हे रावणाचे वडील होते, तर असुर कन्या 'कैकसी' ही त्याची आई होती. उत्तर प्रदेशातील 'बिसरख' गावात विश्रवा महर्षींचा आश्रम होता आणि तिथेच रावणाचा जन्म झाला असे मानले जाते. रावणाचे मूळ नाव दशग्रीव होते. कुंभकर्ण, बिभीषण हे त्याचे भाऊ आणि शूर्पणखा ही त्याची बहीण होती.
35
रावणाला मिळालेले वरदान
वडिलांकडून वेद, शास्त्र आणि संगीताचे धडे गिरवल्यानंतर रावणाने आईच्या सांगण्यावरून असुरी शक्ती मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून देव, राक्षस आणि यक्षांकडून मृत्यू न येण्याचे वरदान मिळवले. तसेच, भगवान शिवाला आपल्या भक्तीने आणि सामगानाने प्रसन्न करून त्याने आत्मलिंग आणि शक्तिशाली 'चंद्रहास' तलवार मिळवली.
त्याकाळी समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक असलेली 'लंका' रावणाचा सावत्र भाऊ कुबेराच्या ताब्यात होती. वडील एकच असले तरी कुबेर देवांच्या बाजूने होता, तर रावण असुरांच्या बाजूने होता. अफाट शक्ती मिळवल्यानंतर रावणाने आईच्या इच्छेखातर लंकेवर हल्ला केला. त्याने कुबेराचा पराभव करून त्याचे 'पुष्पक विमान' सुद्धा हिसकावून घेतले.
55
यशच्या भूमिकेवर चर्चा
कुबेराला लंकेतून हाकलून दिल्यानंतर रावणाने लंकेच्या सिंहासनावर ताबा मिळवला. त्याच्या राजवटीत लंका सोन्याची झाली आणि तिला मोठे वैभव प्राप्त झाले. भारतात जन्मलेला आणि स्वतःच्या पराक्रमाने लंकेचा राजा बनलेला रावण हा पुराणातील एक महत्त्वाचा भाग आहे. नुकताच नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमाचा पहिला भाग रिलीज झाला आहे. यात अभिनेता यशने रावणाची भूमिका साकारली असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.