या 5 महिन्यांत जन्मलेले असतात लकी, श्रीमंतीचा असतो योग

Published : Dec 21, 2025, 02:04 PM IST

Birth Month : आयुष्यात खूप पैसे कमवावेत आणि श्रीमंत व्हावं, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी ते खूप मेहनतही करतात. पण, काही विशिष्ट महिन्यांत जन्मलेल्या लोकांच्या नशिबात अशी श्रीमंती असतेच. ते महिने कोणते आहेत, ते पाहूया...

PREV
15
जानेवारी महिना

जानेवारी महिन्यात जन्मलेले लोक खूप शिस्तप्रिय असतात. ते खूप कष्टाळू असतात. ते झटकन करोडपती होत नाहीत, पण ते हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने इच्छित स्थानी पोहोचतात. आर्थिकदृष्ट्या ते मोठे उद्दीष्ट्य गाठतात.

25
मार्च महिना

मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये सर्जनशीलता खूप जास्त असते. त्यांची कल्पनाशक्तीही चांगली असते. या महिन्यात जन्मलेले लोक कधी ना कधी श्रीमंत होतातच. व्यवसाय, कला, मीडिया आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये कार्यरत असतील तर, त्यांना जास्त पैसे कमावण्याची संधी मिळते.

35
मे महिना

मे महिन्यात जन्मलेली लोक श्रीमंत होण्याची शक्यता खूप जास्त असते. या महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये कणखर निर्णय घेण्याची क्षमता असते. त्यांच्यात नेतृत्वगुणही अधिक असतात. व्यवसाय, रिअल इस्टेट आणि मॅनेजमेंट यांसारखी क्षेत्रे त्यांना अनुकूल ठरतात.

45
ऑगस्ट महिना

ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये उपजतच अधिकार आणि आत्मविश्वास असतो. ते मोठी ध्येये नजरेसमोर ठेवतात आणि ती साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. या महिन्यात जन्मलेले लोक राजकारण, व्यवसाय आणि कॉर्पोरेट सारखी क्षेत्रे निवडल्यास चांगली कमाई करतात.

55
नोव्हेंबर महिना

नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक कष्टाळू असतात, मेहनत करून संपत्तीत भर टाकतात. ते धोरणात्मक विचार करतात. फायनान्स, स्टॉक मार्केट आणि गुंतवणुकीतून पैसे कमावण्याची शक्यता जास्त असते.

टीप : ज्योतिषानुसार या महिन्यात जन्मलेल्यांचा धनयोग बलवान असतो.

Read more Photos on

Recommended Stories