Numerology Aug 4 : आज शनिवारचे अंकशास्त्र भविष्य, या अंकाच्या आरोग्यावर ऋतू बदलाचा परिणाम होणार!

Published : Aug 23, 2025, 09:19 AM IST

प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण जाणून घ्या. 

PREV
19
अंक १ (कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेले व्यक्ती)

गणेश म्हणतात, मुलांशी संबंधित अडचणी दूर होतील. आजचा दिवस मनोरंजनात जाईल. पैशाच्या बाबतीत गोंधळ होऊ शकतो, पण आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वास टिकून राहील. ऋतू बदलामुळे तब्येत थोडी बिघडू शकते.

29
अंक २ (कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेले व्यक्ती)

गणेश म्हणतात, धार्मिक कामांवर खर्च होईल. आज विचारपूर्वक निर्णय घ्या. मिळालेल्या मालमत्तेबाबत वाद उद्भवू शकतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळेल.

39
अंक ३ (कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेले व्यक्ती)

गणेश म्हणतात, संयुक्त कुटुंबात किरकोळ गोष्टींवरून वाद होऊ शकतो. व्यवसायात सावधगिरी बाळगा. कामांमध्ये सकारात्मक दृष्टी ठेवा. अन्यथा विश्वासघात सहन करावा लागू शकतो.

49
अंक ४ (कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेले व्यक्ती)

गणेश म्हणतात, घरी नातेवाईक जमतील. व्यवसायात प्रगती होईल. बोलताना नकारात्मक शब्दांचा वापर करू नका. दिवस आनंदात जाईल. आजचा दिवस एन्जॉय करा.

59
अंक ५ (कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेले व्यक्ती)

गणेश म्हणतात, ग्रहांची स्थिती अनुकूल राहील. काही कारणाने निराशा वाटू शकते. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी जुळवून घ्यावे. प्रत्येक कामात सावधगिरी ठेवा.

69
अंक ६ (कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेले व्यक्ती)

गणेश म्हणतात, सध्याच्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. घरातील मोठ्यांच्या निर्णयाचा मान ठेवा. कष्ट करावे लागतील. आत्ता कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका.

79
अंक ७ (कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेले व्यक्ती)

गणेश म्हणतात, आध्यात्मिक किंवा धार्मिक कामांतून शांती मिळेल. राजकीय संबंध वाढतील. अतिव्यस्ततेमुळे दिवस कठीण जाईल. कुटुंबीयांकडे लक्ष द्या. कौटुंबीक स्वास्थ लाभेल.

89
अंक ८ (कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेले व्यक्ती)

गणेश म्हणतात, दैनंदिन जीवनशैलीत थोडे बदल करणे फायद्याचे ठरेल. योग आणि ध्यानावर विश्वास ठेवा. पती-पत्नींनी परस्पर आदर आणि प्रेम टिकवावे. भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका.

99
अंक ९ (कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेले व्यक्ती)

गणेश म्हणतात, ग्रहांची स्थिती अनुकूल राहील. आज मान-सन्मान वाढेल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी योग्य दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता. प्रिय व्यक्तींसोबत दिवस आनंदात जाईल.

Read more Photos on

Recommended Stories