Navratri 2025 : या 5 राशींवर देवी दुर्गाची कृपा, नवरात्रीच्या शुभ मुहर्तावर नशीब बदलेल!

Published : Sep 23, 2025, 12:39 PM IST

Navratri 2025 : देवी दुर्गा या 5 राशींवर विशेष प्रेम करते. नवरात्रीच्या काळात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना प्रचंड धनसंपत्तीचा आशीर्वाद मिळतो! जाणून घ्या या कोणत्या ५ राशी आहेत. 

PREV
15
वृषभ रास

वृषभ रास देवी दुर्गाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. या राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिक नेतृत्व क्षमता असते. ते आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आणि आव्हानांना न घाबरता सामोरे जातात. या राशीचे लोक आत्मविश्वासू असतात. 

25
कर्क रास

कर्क रास देवी दुर्गाच्या आवडत्या राशींपैकी एक मानली जाते. देवीच्या कृपेने या राशीचे लोक बुद्धिमान, मेहनती आणि जबाबदार असतात. ते योग्य निर्णय घेतात आणि धार्मिक कार्यात रस घेतात. त्यांच्यावर देवीची कायम कृपा असते.

35
सिंह रास

सिंह राशीच्या लोकांवर देवीची विशेष कृपा असते. हे लोक खूप उत्साही, साहसी आणि धार्मिक स्वभावाचे असतात. नशीब नेहमीच त्यांची साथ देते आणि ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. त्यांची तत्परता वखाणण्याजोगी असते.

45
कन्या रास

कन्या राशीचे लोक धार्मिक कार्यात पुढे असतात आणि इतरांना मदत करण्यात आनंद मानतात. देवी दुर्गाच्या कृपेने त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात. हे लोक उत्साही आणि संवेदनशील असतात. तसेच भावनिकही असतात.

55
धनु रास

या राशीचा स्वामी गुरु आहे. हे लोक आपल्या मेहनतीने यश मिळवतात. नोकरी किंवा व्यवसायात चांगली कामगिरी करतात आणि प्रगतीच्या संधी मिळवतात. देवी दुर्गाच्या कृपेने त्यांना मान-सन्मान मिळतो. त्यांची समाजात प्रतिष्ठा वाढते.

Read more Photos on

Recommended Stories